शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधी एकाकी, कुणी ऐकत नाही, LPG मुद्द्यावर पक्षातच उभी फूट; नेते करतायत मोदींचे कौतुक
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
5
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात लागला बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
6
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
7
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
8
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
9
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
10
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
11
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
12
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
13
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
14
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
15
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
16
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
17
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
18
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
19
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
20
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकवरील मित्रासाठी सुनेने चोरले घरातील २२ तोळे सोन्याचे दागिने

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 29, 2019 22:14 IST

फेसबुकवरील मित्राला मदत करण्यासाठी सुनेने आपल्याच घरातील दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे.

हिंगणघाट (वर्धा) -  फेसबुकवरील मित्राला मदत करण्यासाठी सुनेने आपल्याच घरातील दागिने चोरल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी कारवाई करत पोलिसांनी सुनेला तिच्या मित्रासहित अटक केली आहे. हिंगणघाट येथील सुधाकर विठोबाजी कदम यांनी याप्रकरणी तक्रार केली होती. घरातून कोणी अज्ञात व्यक्तीने कपाटातील सोन्याचे दागिने चोरल्याचं त्यांनी तक्रारीत सांगितलं होतं. तक्रारीत पाच लाख रूपये किंमतीचे २२ तोळे सोने चोरी झाल्याचं तक्रारीत सांगण्यात आलं होतं.हिंगणघाट पोलिसांनी याप्रकरणी तक्रार करताना कदम कुटुंबातील सदस्यांचीही चौकशी केली. यावेळी छोटी सून थोडी घाबरलेली आणि प्रश्न टाळण्याचा प्रयत्न करत असताना जाणवलं. संशय आल्याने तिची कसून चौकशी करण्यात आली. शेवटी तिने धनंजय जाधव नावाच्या व्यक्तीला मदत केल्याचे कबुल केले.

फेसबुकच्या माध्यमातून तिची धनंजय जाधवसोबत ओळख झाली होती. ती आरोपी धनंजयच्या सतत संपर्कात होती. ओळख वाढल्यावर आरोपीने त्याच्या वडिलांची प्रकृती बरी नसल्याचे सांगत उपचार करण्यासाठी मदत मागितली. त्याची भुरळ पडलेल्या सुनेने शेवटी घरातील दागिने लंपास केले. तिने एकाच वेळी सगळे दागिने चोरले नाही. चार वेळा चोरी करत तिने एकूण २२ तोळे सोन्याचे दागिने लंपास केले.यानंतर पोलिसांनी धनंजय जाधव याचा शोध घेण्यास सुरुवात केली. पण या नावाचा ईसम अस्तित्वातच नसल्याचे स्पष्ट झाल्यावर आरोपीचा शोध -घेणे कठीण झाले होते. मात्र पोलिसांनी एका माहितीच्या आधारे नांदेडला चौकशी केली. मोबाइलच्या आधारे हा आरोपी नांदेडातील सिडको परिसरात असल्याचे स्पष्ट झाले. शेवटी आरोपीला राहत्या घरातून ताब्यात घेण्यात आले. मात्र त्याने आपले नाव धनंजय नसून अविनाश गणपत भालेराव असल्याचे सांगितले. तसेच उडवाउडवीची उत्तरे दिली.पोलिसांनी त्याला हिंगणघाटला आणले व आरोपी सुनेसमोर उभे केले. घरून चोरलेले दागिने याच व्यक्तीला दिल्याचे तिने सांगितल्यावर पोलिसांनी त्याची पुन्हा चौकशी केली. यावेळी त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. तसेच चोरलेल्या दागिन्यांपैकी काही दागिने घरी व काही नांदेडच्या उत्तम ज्वेलर्सला विकल्याचे मान्य केले. पोलिसांनी आरोपीच्या घरून बारा तोळे सोन्याचे दागिने व सुवर्णकार उत्तम लोलगे यांच्याकडून दहा तोळे सोन्याचे दागिने जप्त केले. आरोपी अविनाश व सुनेला न्यायालयात हजर करून सात दिवसाची पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. पोलीस निरिक्षक सत्यवीर बंडीवार व उपनिरिक्षक परमेश्वर आगासे यांनी हा गुन्हा पोलीस अधिक्षक डॉ. बसवराज तेली यांच्या मार्गदर्शनात उघडकीस आणला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी