माणूस रागाच्या भरात कोणत्या टोकाला जाईल याचा नेम नाही. उत्तराखंडच्या ऊधमसिंह नगरमधील दिनेशपूरमध्ये एका सुनेने क्रूरतेच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. शुल्लक घरगुती वादातून या सुनेने चक्क आपल्या माहेरच्या लोकांना बोलावून ७० वर्षीय सासूची हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या हल्ल्यात तिचा पतीही गंभीर जखमी झाला असून, पोलिसांनी याप्रकरणी मुख्य आरोपी सुनेसह ६ जणांना ताब्यात घेतले आहे.
माहेरच्या मंडळींनी घातला धुमाकूळ
मिळालेली माहिती अशी की, प्रसेनजीत शाह आणि त्याची पत्नी सुरभी यांच्यात गेल्या काही काळापासून खटके उडत होते. ४ वर्षांपूर्वी त्यांचे लग्न झाले होते, मात्र तेव्हापासूनच दोन्ही कुटुंबात तणाव होता. वादाचे रूपांतर भांडणात झाले आणि संतापलेल्या सुरभीने आपल्या माहेरच्या मंडळींना मदतीला बोलावले. माहेरून आलेल्या लोकांनी घरात शिरून प्रसेनजीत आणि त्याची वृद्ध आई संध्या शाह यांच्यावर लाठी-काठ्यांनी बेदम हल्ला चढवला.
७० वर्षीय सासूचा जागीच मृत्यू
हल्ला इतका भीषण होता की, ७० वर्षांच्या संध्या शाह यांचा जागीच मृत्यू झाला. डोळ्यांदेखत आईचा जीव जाताना पाहून प्रसेनजीतने वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यालाही रक्ताळलेल्या अवस्थेपर्यंत मारहाण करण्यात आली. आरडाओरडा ऐकून शेजारी जमा झाले, तोपर्यंत आरोपींनी तिथून पळ काढला होता.
पोलिसांची मोठी कारवाई
घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधीक्षक आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली. पोलिसांनी तत्परता दाखवत मुख्य आरोपी सून सुरभीसह सहा जणांना अटक केली आहे. "आम्ही या प्रकरणाची सखोल चौकशी करत आहोत. आरोपींना कठोर शिक्षा दिली जाईल," असे आश्वासन पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहे. संध्या शाह यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
Web Summary : Uttarakhand: A woman conspired with her family to kill her mother-in-law following a domestic dispute. The husband was also critically injured in the attack. Police have arrested six individuals, including the daughter-in-law, and are investigating the crime.
Web Summary : उत्तराखंड के उधमसिंह नगर में एक बहू ने घरेलू विवाद के बाद अपने मायके वालों के साथ मिलकर अपनी सास की हत्या कर दी। हमले में पति गंभीर रूप से घायल हो गया। पुलिस ने बहू सहित छह लोगों को गिरफ्तार किया है।