शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमप्रकरणातून मुलीचं टोकाचं पाऊल; बदनामीच्या भीतीने कुटुंबीयांनी लपवला मृतदेह अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2024 16:07 IST

तरुणी प्रियकराशी बोलायची, याला वडील आणि भावाचा विरोध होता.

उत्तर प्रदेशातील फतेहपूर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे, जिथे मुलीच्या आत्महत्येनंतर कुटुंबीयांनी तिचा मृतदेह दोन दिवस घरात लपवून ठेवला होता. त्यानंतर दुर्गंधी येऊ लागल्याने त्यांनी मृतदेह गोणीत टाकून विहिरीत फेकून दिला. सध्या याप्रकरणी पोलिसांनी वडिलांना अटक केली आहे. तसेच एक जण फरार असून त्याचा शोध सुरू आहे. 

गेल्या आठवड्यात सुलतानपूर घोष पोलीस स्टेशन हद्दीतील एका गावात एका विहिरीत एका मुलीचा मृतदेह सापडला होता. मात्र, दोन-तीन दिवस कोणालाच काही कळलं नाही. याच दरम्यान हे प्रकरण पोलिसांपर्यंत पोहोचलं. पोलिसांनी तपास सुरू केला असता, मुलीचा मृत्यू आधीच झाल्याचं समोर आलं. यामागे प्रेमप्रकरण असल्याचं कळलं. अशा स्थितीत कुटुंबीयांची कसून चौकशी केली असता हा भयंकर प्रकार उघडकीस आला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी तिच्या प्रियकराशी बोलायची, याला वडील आणि भावाचा विरोध होता. त्यांनी तिला यावरून दम देखील दिला होता. यानंतर नाराज झालेल्या मुलीने गळफास घेऊन आत्महत्या केली. मुलीच्या आत्महत्येनंतर बदनामीच्या भीतीने कुटुंबीयांनी मृतदेह दोन दिवस घरात लपवून ठेवला. नंतर मृतदेहाला दुर्गंधी आल्याने तो गोणीत भरून विहिरीत टाकण्यात आला.

पोलीस प्रकरणामुळे मृताच्या कुटुंबीयांनी ही गोष्ट कोणालाही सांगितली नाही. मृतदेहाची स्वतः विल्हेवाट लावली. मात्र आजूबाजूच्या लोकांना मुलगी दिसत नसल्याने त्यांनी प्रश्न विचारण्यास सुरुवात केली. त्यावर कुटुंबीयांनी ती नातेवाईकाच्या घरी गेल्याची खोटी गोष्ट रचली. मात्र विहिरीत मुलीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली.

पोलिसांनी घटनेचा तपास सुरू केला. गावकऱ्यांशी बोलल्यानंतर तरुणीचे गावातीलच एका तरुणासोबत प्रेमसंबंध असल्याचे उघड झाले. अशा स्थितीत कुटुंबीयांची  चौकशी केली असता संपूर्ण गुपित बाहेर आले. आमची बदनामी होत असून पोलीस कारवाईला घाबरत असल्याचं वडिलांनी सांगितलं. त्यामुळे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यात आली.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी