शहरं
Join us  
Trending Stories
1
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
2
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
3
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
4
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
5
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
6
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
7
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
8
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
9
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
10
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
11
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
12
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
13
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
14
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
15
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण
16
मोठी बातमी: दहशतवादी हल्ल्यातील मृतांच्या कुटुंबीयांना ५० लाखांची मदत; राज्य सरकारचा निर्णय
17
बाजार सपाट पातळीवर बंद; रिलायन्सचा शेअर पुन्हा आला धावून, 'या' सेक्टरवर दबाव
18
ATM मधून वारंवार पैसे काढायची सवय असेल तर ती बदला, नाहीतर १ मे पासून होईल नुकसान
19
अण्वस्त्रांची धमकी देणाऱ्या पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचे तोंड भारताने केले बंद; एक्स अकाउंटवर घातली बंदी
20
Viral Video: बिबट्या थेट पोलीस ठाण्यातच आला! पोलिसाने पाहिलं, पण नंतर काय घडलं?

३ कोटींसाठी मुलीनं केला छळ; आई-बापाला बंद खोलीत ४ महिने कैद केले, त्यानंतर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 19:11 IST

हे प्रकरण हबीबगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे. अरेरा कॉलनी बँकेचे निवृत्त अधिकारी सीएम सक्सेना राहतात.

भोपाळ - ३ कोटी रुपयांसाठी भोपाळच्या पॉश परिसरात एका मुलीनं स्वत:च्या आई-बापाला आणि भावाला घरात कैद केले. वडील बँकेतील निवृत्ती अधिकारी आहेत. मुलीने आधी वडिलांच्या घरावर कब्जा केला त्यानंतर त्यांच्याकडे ३ कोटींची मागणी केली. इतक्यावर ती थांबली नाही तर तिने वडील, आई आणि भावाला घराच्या एका खोलीत बंद करून बेदम मारहाण केली. त्यांना कुणालाही भेटू दिले नाही. शेजाऱ्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर ४ महिन्यांनी अखेर पोलिसांनी रेस्क्यू करत या तिघांची सुटका केली आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी पाठवले. 

हे प्रकरण हबीबगंज पोलीस स्टेशनच्या हद्दीतील आहे. अरेरा कॉलनी बँकेचे निवृत्त अधिकारी सीएम सक्सेना राहतात. त्यांचे वय ८० आहे. सक्सेना यांची पत्नी आणि मुलगा त्यांच्यासोबत असतात. मुलगा मानसिक आजारी आहे. अरेरा कॉलनीत ज्या फ्लॅटमध्ये ते राहतात त्याची किंमत १ कोटींहून अधिक आहे. सक्सेना यांनी मुलीचे लग्न २००२ मध्ये लखनऊमध्ये केले. जावई आर्मीत आहे. काही दिवसांपर्यंत सर्वकाही ठीक सुरू होते. 

मुलीनं केला घरावर कब्जा२०१६ मध्ये मुलीचं सासरी भांडण झाले. त्यानंतर पतीने तिला घटस्फोट दिला. मुलगी तिच्या २ मुलांसह आई वडिलांच्या घरी राहायला आली. याठिकाणी सर्वात आधी तिने वडिलांकडून एटीएम कार्ड हिसकावले आणि अकाऊंटमधून सर्व पैसै काढले. त्याचसोबत ३ कोटींची मागणी केली. वडिलांनी पैसे देण्यास मनाई केली तेव्हा मुलीने तिच्या मुलांना सोबत घेत त्यांना मारहाण केली. 

४ महिन्यांपूर्वी एका खोलीत कैद केलेपैसे न मिळाल्याने संतापलेल्या मुलीची क्रूरता आणखी वाढली. तिने आई वडिलांना मारहाण केली. ४ महिने आई वडील आणि भावाला एका खोलीत कोंडले. तिथे त्यांना खायलाही काही दिले नाही. आई वडिलांना फक्त १ चपाती देत होती. जेवण मागितल्यावर मुलगी प्लॅस्टिकच्या पाईपने त्यांना मारहाण करायची. तिच्यासोबत तिची मुलेही मारहाण करायची. या तिघांना खोलीतून बाहेर पडण्यासही मनाई होती. 

मित्राच्या तक्रारीवरून कारवाईसीएस सक्सेना यांना १९ जूनला त्यांचा मित्र भेटायला आला. खूप दिवस सक्सेना भेटले नव्हते त्यामुळे विचारपूस करण्यासाठी मित्र घरी पोहचला. घरी आलेल्या वडिलांच्या मित्रांसोबत मुलीने गैरवर्तन केले. त्यांना हाकलवून घराबाहेर काढले. त्यामुळे काहीतरी विपरीत घडलंय ही शंका घेऊन ते थेट पोलीस स्टेशनला पोहचले. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत या तिघांना रेस्क्यू करून घराबाहेर काढले. पोलिसांनी रेस्क्यू केल्यानंतर आई वडिलांच्या डोळ्यात पाणी आले. शरीर अशक्त झाल्यामुळे सर्वात आधी जेवण द्या अशी मागणी त्यांनी पोलिसांकडे केली. वडिलांचे घर विकून पैसे देण्यासाठी मुलगी वडिलांवर दबाव बनवायची. त्याचसोबत वडिलांनी मिळणारी पेन्शन रक्कम मुलगी दरमहिन्याला बँकेतून काढायची. अनेक कागदपत्रांवर तिने सह्या घेतल्या होत्या. हा प्रकार उघडकीस येताच पोलिसांनी मुलगी आणि तिच्या दोन्ही मुलांवर गुन्हा दाखल केला आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी