शहरं
Join us  
Trending Stories
1
सिन्नरमध्ये भीषण अपघातात चौघांचा होरपळून मृत्यू; जागरण गोंधळावरून परतताना काळाचा घाला
2
"अटी मान्य केल्या तरच चर्चा"; इराणचे शिष्टमंडळ पाकिस्तानात दाखल; अमेरिकेला दिला स्पष्ट इशारा
3
आजचे राशीभविष्य, ११ एप्रिल २०२६: कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल; मितभाषी राहून मतभेद दूर करा
4
अभिमानास्पद! भारताच्या 'प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर'ची जागतिक स्तरावर प्रशंसा
5
होर्मुझच्या सामुद्रधुनीवर इराणची पकड कायम, टोल वसुली चालू; ६ जहाजे रवाना
6
महिला, बेरोजगारांना ३ हजार; ४५ दिवसांत ‘सातवा वेतन आयोग: बंगालसाठी भाजपचे संकल्पपत्र
7
आता यंदाच्या वर्षापासून अकरावीत प्रवेश घेण्यापासून एकही विद्यार्थी वंचित राहणार नाही!
8
इस्रायल-हमास युद्धात सहा महिन्यांचा ‘कागदी’ युद्धविराम; गाझा पट्टीतील परिस्थिती आजही भयावह
9
महागडे उपचारही आता सरकारी खर्चातून! योजनेसाठी अटी आणि निकष काय?
10
महामुंबईत गिरणी कामगारांसाठी २,५२१ घरांची लॉटरी काढावी; एकनाथ शिंदे यांचे म्हाडाला निर्देश
11
एआयच्या साहाय्याने पार्किन्सनचे निदान करणे होणार अधिक सोपे; आधीच मिळणार इशारा
12
विमानतळावर ३८ कोटींच्या सोने तस्करीचा पर्दाफाश; DRI कडून केनियाच्या २६ नागरिकांना अटक
13
द्रमुकचा उमेदवार निवडणे म्हणजे माझा विजय निश्चित: उपमुख्यमंत्री उदयनिधी स्टॅलिन
14
१० हजारांवरील व्यवहार तासभर लेट! व्यवहार थोडे स्लो, पण खूप जास्त सुरक्षित होतील!
15
सायबर फ्रॉडमध्ये गमावलेले ३८ लाख व्यापाऱ्याला परत करा! न्यायालयाचे HDFC बँकेला निर्देश
16
पीएफचा क्लेम करूनही पैसे अडकले आहेत? धावपळ टाळण्यासाठी नेमके काय कराल?
17
म्युच्युअल फंडाचा ‘धमाका’; इक्विटी गुंतवणुकीत ५६ टक्क्यांची मोठी वाढ!
18
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
19
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
20
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

डान्स, डिनर मग मर्डर...! आप नेत्याचं रचलं षडयंत्र; सुपारी देऊन पत्नीला संपवलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2025 09:22 IST

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहचतात आणि लिप्सी आणि अनोख यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करतात.

लुधियाना - एक पती त्याच्या पत्नीला घेऊन डिनरसाठी हॉटेलला पोहचतो. डिनरआधी दोघेही डान्स करतात. त्यावेळी पती डान्सचा व्हिडिओ बनवतो. त्यानंतर तो व्हॉट्सअपच्या स्टेटसला ठेवतो मात्र काही तासांनी अचानक त्याच्या पत्नीचा खून होतो. पत्नीच्या हत्येनंतर शोकाकुल झालेला पती तिच्या गुन्हेगारांना पकडण्यासाठी धरणे आंदोलन करतो मात्र जेव्हा या घटनेतील खरा गुन्हेगार समोर येतो, तेव्हा सगळेच हैराण होतात.

पत्नीच्या मृत्यूला १५ तास उलटले होते तरीही पती हॉस्पिटलसमोर काही लोकांना सोबत घेत आंदोलनाला बसला होता. पत्नीच्या मारेकऱ्याला पकडा अशी त्याची मागणी होती. त्या पतीचं नाव होतं अनोख मित्तल, ज्याच्या पत्नीचा खून झाला होता. आनंदाने एकत्र राहणाऱ्या जोडप्याला कुणाची तरी दृष्ट लागली असावी असंच लोकांना वाटत होते. पतीची तळमळ पाहून प्रत्येकाने दु:ख व्यक्त केले. १६ जानेवारीला लुधियानापासून २५ किमी अंतरावर असणाऱ्या रिसोर्टमध्ये जोडपे गाण्याच्या तालावर थिरकत होते. काही तासाने त्यातील एकाची हत्या होते. अनोखची पत्नी लिप्सी त्याला कायमची सोडून गेलेली असते. लिप्सीसोबतचा डान्स व्हिडिओ काही तासापूर्वी अनोखने त्याच्या स्टेटसला ठेवलेला असतो. मात्र हे सर्व खूनी षडयंत्राचा पहिला भाग होता.

पती-पत्नीचा डान्स पाहून प्रत्येकाला ते दोघे किती खुश आहेत ते दिसते. परंतु पतीच्या डोक्यात भलतेच काही सुरू होते. पुढील १ तासात पत्नी या जगात नसणार हे त्याला आधीच माहिती होते कारण पत्नी लिप्सीला मारणारा दुसरा कुणी नव्हता तर ते पती अनोखनेच रचलेलं षडयंत्र होते. रात्री सव्वा दहा वाजता हे जोडपे रिसोर्टला पोहचले, तिथे डान्स केला, मग डिनर करून १२ च्या सुमारास दोघेही त्यांच्या कारमधून घरी जाण्यास निघाले. रिसोर्टपाहून काही अंतरावर गेल्यानंतर अचानक अनोख मित्तल वॉशरूमला जाण्याच्या बहाण्याने कार थांबवतो. काही वेळाने तो पुन्हा कारमध्ये येतो, कार पुढे नेतो आणि काही अंतरावर जाऊन पुन्हा कार थांबवतो. कारची पार्किंग लाईट सुरू करतो. तितक्यात अचानक ४-५ लोक तिथे पोहचतात आणि ते अनोखची पत्नी लिप्सीवर हल्ला करतात, तिच्या अंगावरील दागिने काढतात, चाकूने वार करत तिला कारमधून खाली फेकतात, मग त्याच कारमधून ते लोक फरार होतात. 

या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर ते घटनास्थळी पोहचतात आणि लिप्सी आणि अनोख यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करतात. अनोख एक उद्योगपतीसोबतच राजकीय पक्षाचा नेता असतो. सकाळी सकाळी ही बातमी वाऱ्यासारखी पसरते. एका नेत्याच्या पत्नीचा खून होतो हा राजकीय मुद्दा बनतो. अनोखचे समर्थक गुन्हेगारांना पकडण्याची मागणी करत हॉस्पिटलबाहेर आंदोलन करतात. या घटनेत अनोख किरकोळ जखमी होतो. गुन्हेगारांना पकडण्याची मागणी करत पती अनोख स्वत: आंदोलनात उतरतो. 

पोलिसांना संशय

दरोडेखोरांनी एका महिलेवर जीवघेणा हल्ला केला परंतु त्या हल्ल्यात पती किरकोळ जखमी झाला. दरोडेखोरांनी आधी मला बेशुद्ध केले त्यानंतर ही घटना घडली. पोलिसांना यावर विश्वास बसत नव्हता. उपचारावेळी डॉक्टरांनी अनोखला तपासले तेव्हा त्याचा दावा खोटा निघाला. कुठल्याही केमिकलने अनोखला बेशुद्ध केल्याचे पुरावे सापडले नाही. त्यामुळे पोलिसांचा संशय आणखी बळावला. त्यानंतर पोलिसांनी कॉल डिटेल्स, लोकेशन तपासले तेव्हा घटनेनंतर अनोखने एक मेसेज पाठवला होता त्यात केवळ डन असा शब्द होता. हा मेसेज त्याने त्याच्या गर्लफ्रेंडला पाठवला होता. तपासात अनोखची गर्लफ्रेंड असल्याचं समोर आले. अनोखला तिच्याशी लग्न करायचे होते त्यासाठी लिप्सीला घटस्फोट देण्यासाठी अनोख दबाव टाकत असल्याचं पुढे आले. 

दरम्यान, यानंतर पोलिसांनी अनोखला खाकीचा धाक दाखवला तेव्हा त्याने हत्येचं षडयंत्र रचल्याची कबुली दिली. प्लॅनिंगनुसार त्याने पत्नीला डिनरला नेले, तिथे डान्स केला. हे रिसोर्ट शहरापासून लांब होतो, जिथे जास्त कुणी जात नाही. हे सर्व सुपारी किलर यांना सांगितले होते. किती वाजता रिसोर्टला जाणार, तिथून कधी निघणार, कार कुठे थांबवणार हे सर्व आधीच ठरले होते. जसं त्याने कार पार्किंग लाईट लावली तेव्हा लिप्सीवर हल्ला करण्याचा तो इशारा होता. त्यानुसार हल्लेखोरांनी अनोखच्या पत्नीचा खून केला. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी