शहरं
Join us  
Trending Stories
1
आमदार आल्यानंतर उभे न राहिल्याने डॉक्टरवर कारवाई; हायकोर्टानं काढली सरकारची खरडपट्टी, म्हणाले...
2
ड्रग्ज-दहशतवादाची साखळी घातक, विकासाचे जुने मॉडेल बदलायची गरज; PM नरेंद्र मोदींचं प्रतिपादन
3
VIDEO: तुझे लागे न नजरिया... श्रेयंका अन् जेमिमाचा 'टीम इंडिया'च्या पोरींसोबत भन्नाट डान्स
4
"लढाई करून जिंकण्याचा दम नाही म्हणूनच..."; दिल्ली स्फोटावरून लष्करप्रमुख द्विवेदींनी पाकिस्तानचे काढले वाभाडे
5
५ डॉक्टरांनी २६ लाख जमवले; दिल्लीतील स्फोट फक्त ट्रेलर, अनेक शहरांत हल्ल्याची योजना, NIA चा खुलासा
6
आजचे राशीभविष्य, २३ नोव्हेंबर २०२५: यश मिळेल, प्रतिष्ठा उंचावेल; पण पाण्यापासून सावधान!
7
VIDEO: स्मृती मंधानाचा होणाऱ्या पतीसोबत अफलातून डान्स, लग्नाआधी 'संगीत'मध्ये तुफान धम्माल
8
मेहनती आहात, सातत्याने काम करता तरीही तुमचे करिअर 'स्लो' झालेय?; तुम्ही ५ 'ट्रॅप'मध्ये अडकलात
9
भाजपा नेत्यानं जिथं कानशिलात लगावली, तिथेच अपमानाचा वचपा काढण्यासाठी शिंदेसेनेचा जल्लोष
10
भाजपचे नेतेच पसरवत आहेत राज्यात भाषिक प्रांतवादाचे विष; उद्धव ठाकरे यांची टीका
11
शिंदेसेनेकडून ४० संपर्कप्रमुखांची नियुक्ती; निवडणुकीपर्यंत जिल्ह्यातच थांबण्याचे आदेश
12
कुजबुज! आनंद दिघेंच्या मुशीत तयार झालेली शिवसेना ठाण्यात भाजपासमोर नांगी टाकते का? चर्चा सुरू
13
'नॉमिनी' ही मालमत्तेची केवळ 'कायदेशीर विश्वस्त'; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा
14
पुणे पोलिसांची मध्य प्रदेशात धडक कारवाई; शस्त्रसाठ्यांचे अड्डे उद्ध्वस्त, ५० भट्टया नष्ट
15
उसाच्या फडातून येतो गुरगुरण्याचा आवाज अन् उडतो जिवाचा थरकाप; शेतात मजूर मिळेनात
16
देवदर्शनाचा प्रवास अंतिम ठरला! टायर फुटला अन् ३ निष्पाप ठार; अणदूरनजीक दुर्घटनेत ११ गंभीर जखमी
17
दिवाळखोरीच्या आड पोटगी कुठल्याही परिस्थितीत टाळता येणार नाही - हायकोर्ट
18
बिबट्याच्या भीतीने शेतात जनावरे चरायला सोडणेही झाले बंद; लोकांच्या राहणीमानात बदल
19
माणसं आली पिंजऱ्यात, बिबट्या मात्र मोकाट! भय इथले संपत नाही, सायंकाळी ६ च्या आत सगळेच घरात
20
दिल्ली बॉम्बस्फोटानंतर अचानक पाकिस्तानला जाणारे फोन कॉल्स कमी झाले; तपास यंत्रणाही हैराण
Daily Top 2Weekly Top 5

डान्स बार बलात्कार प्रकरण : केरळच्या सचिवांच्या मुलाचा अटकपूर्व जामीन मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 16:19 IST

ओशिवरा पोलिसांनी बिनॉय याच्यावर बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.

ठळक मुद्देन्यायालयाने बिनॉय याचा २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केलादुबईमधील एका बार हॉटेलमध्ये ती डान्स बारचे काम करत होती. बिनॉयचा विवाह झाला आहे,

मुंबई - केरळच्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे (मार्क्सवादी) सचिव कोदियारी बालकृष्णन यांचा मोठा मुलगा बिनॉय कोदियारी याला डान्स बार बलात्कार प्रकरणी बुधवारी दिंडोशी सत्र न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला.बिनॉय याने विवाह करण्याचे आमिष देऊन आपल्याशी शारीरिक संबंध ठेवले. मात्र, नंतर त्याने हे आश्वासन न पाळून आपल्याला फसविले, अशी तक्रार मुंबईची रहिवासी व बार डान्सर हिने ओशिवरा पोलीस ठाण्यात केली. तिच्या तक्रारीनंतर ओशिवरा पोलिसांनी बिनॉय याच्यावर बलात्कार व फसवणुकीचा गुन्हा नोंदविला.अटक होईल, या भीतीने बिनॉय याने दिंडोशी सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला. बार डान्सरने केलेल्या तक्रारीनुसार, या प्रेमप्रकरणातून तिला एक मुलगा झाला आणि आता तो आठ वर्षांचा आहे. २००९ पासून त्यांचे प्रेमप्रकरण आहे. दुबईमधील एका बार हॉटेलमध्ये ती डान्स बारचे काम करत होती. बिनॉयचा विवाह झाला आहे. हे तिला आतापर्यंत माहित नव्हते. काही दिवसांपूर्वी तिने बिनॉयचे फसेबुक अकाउंट पाहिल्यानंतर तिला बिनॉय व त्याच्या पत्नीचे फोटो दिसले.तक्रारदाराने आपले म्हणणे सिद्ध करण्यासाठी बिनॉय गेले कित्येक वर्षे तिच्या बँकेमध्ये ठरावीक रक्कम भरत असल्याचे न्यायालयाला सांगितले. त्यासाठी तिने न्यायालयात बँक स्टेटमेंटही सादर केले.बिनॉयच्या अटकपूर्व जामीन अर्जावर तिने आक्षेप घेतला. बिनॉयचा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात आला, तर तिच्या व तिच्या मुलाच्या आयुष्यासाठी धोका निर्माण होईल. केरळमध्ये सध्या सत्तेत असलेल्या पक्षाच्या माजी गृहविभाग मंत्र्याचा मुलगा आहे. त्यामुळे तिच्या जिवाला धोका आहे, असा युक्तिवाद बार डान्सरच्या वकिलांनी केला.बिनॉयच्या वकिलांनी आक्षेप घेतला. तक्रारदार बिनॉयला ब्लॅकमेल करण्यासाठी हे सर्व करत आहे, असा आरोप बिनॉयच्या वकिलांनी केला. पोलिसांनीही बिनॉयच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आक्षेप घेतला. मुलाची डीएनए चाचणी करून तो बिनॉयचा मुलगा आहे की नाही, याची पडताळणी केली जाऊ शकते. चौकशीकरिता बिनॉयच्या ताब्याची आवश्यकता आहे. आतापर्यंत त्याने तपासास सहकार्य केले नाही. त्यामुळे त्याचा जामीन मंजूर करू नये, असे सरकारी वकिलांनी न्यायालयाला सांगितले. मात्र, न्यायालयाने बिनॉय याचा २५ हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन अर्ज मंजूर केला, तसेच तपासकामात सहकार्य करण्याचा आदेशही न्यायालयाने बिनॉयला दिला.

टॅग्स :Courtन्यायालयRapeबलात्कारPoliceपोलिसKeralaकेरळCommunist Party of indiaकम्युनिस्ट पार्टी आॅफ इंडियाSessions Courtसत्र न्यायालय