शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
6
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
7
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
8
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
9
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
10
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
11
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
12
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
13
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
14
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
15
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
16
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
17
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
18
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
19
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
20
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
Daily Top 2Weekly Top 5

खासगी नर्सिंग होममध्ये सशस्त्र टोळीचा दरोडा; चोरीचा प्रकार सीसीटीव्हीत कैद

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2020 18:32 IST

लॉकडाऊन दरम्यानही गुन्हेगारी व गुन्हेगारांवर कारवाई करण्यात दिल्ली पोलिस अपयशी ठरले आहेत.

ठळक मुद्दे दिल्लीतील गुन्हेगारांनी आता नर्सिंग होमलाही लक्ष्य बनवण्यापासून सोडले नाही आहे.ही घटना 28 मे रोजी घडली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कोरोनाच्या संकटात लॉकडाउन देशात लागू आहे. लॉकडाऊन राखण्याबरोबरच गरजूंना आवश्यक ती मदत पुरविणे याशिवाय कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठीही पोलीस जबाबदारी पार पाडत आहेत. मात्र, लॉकडाऊन दरम्यानही गुन्हेगारी व गुन्हेगारांवर कारवाई करण्यात दिल्लीपोलिस अपयशी ठरले आहेत.दिल्लीतील गुन्हेगारांनी आता नर्सिंग होमलाही लक्ष्य बनवण्यापासून सोडले नाही आहे. दिल्लीतील महिंद्रा पार्क पोलिस स्टेशन परिसरातील एका खासगी नर्सिंग होममध्ये सशस्त्र दरोडेखोरांनी कॅश काऊंटरची लूटमार केली आणि तेथून पळ काढला. ही घटना 28 मे रोजी घडली. संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.सीसीटीव्ही फुटेजमध्ये असे दिसून आले आहे की, दरोडेखोरांनी तोंडाला कापड बांधला होता. त्यांच्या हातात शस्त्रे दिसतआहेत आणि ते शस्त्राच्या धाकावर हॉस्पिटलच्या कर्मचार्‍यांना धमकी देत आहेत. रुग्णालयातील कर्मचारी दरोडेखोरांसमोर लुटू नका अशी विनंती करत आहेत.लूटमारीनंतर दरोडेखोर पळून गेले. यासंदर्भात डीसीपी म्हणाले की, रुग्णालयाकडून कोणतीही लेखी तक्रार आली नाही. तरीही पोलिसांनी दरोड्याचा गुन्हा दाखल करून या घटनेचा तपास सुरू केला आहे. सीसीटीव्ही फुटेजचीही मदत घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले. डीसीपीने असा दावा केला आहे की, लवकरच दरोडेखोरांना ओळखून अटक केली जाईल.

 

 

बनावट कागदपत्रांद्वारे ई-पास बनवून देणारे दोघे ताब्यात

 

मोबाईलवर येत होते अश्लील मेसेज आणि फोटो, दहावीच्या विद्यार्थिनीने केली आत्महत्या 

टॅग्स :DacoityदरोडाPoliceपोलिसcctvसीसीटीव्हीdelhiदिल्ली