शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
6
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
7
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
8
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
9
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
10
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
11
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
12
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
13
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
14
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
15
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
16
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
17
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
18
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
19
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
20
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात दरोड्याचा कट उधळला, पाच जणांना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2019 21:14 IST

विठ्ठलवाडी पोलिसांनी त्यांच्याकडून घातक हत्यारे जप्त केले असून गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देपोलिसांनी घेतलेल्या झडतीत रिक्षात दोन कटावनी, धारधार शस्त्र,नायलॉनची दोरी असे साहित्य आढळून आले.या आरोपींना न्यायालयात हजर केले असता ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

उल्हासनगर - कँम्प क्रमांक 4 येथील स्मशानभूमीजवळ दरोडा टाकण्यासाठी आलेल्या पाच जणांच्या  टोळीच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले. विठ्ठलवाडी पोलिसांनी त्यांच्याकडून घातक हत्यारे जप्त केले असून गुन्हा दाखल केला आहे.

उल्हासनगर कँम्प नं 4 येथील स्मशानभूमी परिसरात विठ्ठलवाडी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटिकरण विभागाचे पोलीस नाईक दिनेश पाटील आणि पोलीस शिपाई समिर गायकवाड बुधवारी मध्यरात्री  पेट्रोलिंग करित होते. त्यावेळी स्मशानभुमी समोरील रस्त्यावर  एका रिक्षामध्ये काही गुन्हेगारी पार्श्वभूमीचे इसम दडून बसल्याची माहिती मिळाली. पेट्रोलिंग करणारे पाटील व गायकवाड यांनी विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात संपर्क साधून घटनेची माहिती दिल्यावर, काही मिनिटात इतर पोलीस कर्मचारी मदतीला धावून आले. त्यांनी सापळा रचून रिक्षात बसलेल्या पाच जणांना ताब्यात घेत त्यांच्यासह रिक्षाची झडती घेतली. पोलिसांनी घेतलेल्या झडतीत रिक्षात दोन कटावनी, धारधार शस्त्र,नायलॉनची दोरी असे साहित्य आढळून आले.विठ्ठलवाडी पोलिसांनी अटक केलेल्या इसमाकडे पोलिसांनी अधिक चौकशी केली असता, त्यांनी दरोड्यासाठी आल्याची कबुली दिली. आरोपींची नावे योगेशचंद्र कुलकर्णी, राहुल राय, दिनेश गायकवाड, सन्नी काळे आणि राघविंद्र दासरी अशी असून यातील एक आरोपी हा सराईत गुन्हेगार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या आरोपींना न्यायालयात हजर केले असता ८ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. याप्रकरणाचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मंगेश जाधव हे करित आहेत. 

टॅग्स :ArrestअटकDacoityदरोडाPoliceपोलिसulhasnagarउल्हासनगर