शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकणारी टोळी जेरबंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 20:05 IST

मालकाला वाचविण्यासाठी नागरीक जमा झाले असता आरोपी हे हवेत गोळीबार करून पळून गेले.

ठळक मुद्देआरोपी यांनी दुकानात प्रवेश करून फिर्यादी यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व  मारहाण करून 20 ग्राम सोन्याचे दागिने व 1, 30, 000/- रुपये रोख  रक्कम जबरीने चोरी केली होती. डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी व्यवसायाची 1, 85, 000/- रोख रक्कम घेऊन जात असताना या आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ही रक्कम लुटली होती. 

ठाणे - कळवा येथील के. के. ज्वेलर्स या दुकान मालकास शस्त्राचा धाक दाखवून लुटणाऱ्या नऊ जणाच्या टोळीला कळवा पोलिसांनीअटक केली आहे.या प्रकरणात 27 जून रोजी गुन्हा दाखल झाल्या नंतर कळवा पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली घटनास्थळावरून मिळणारे पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेज यांच्या माध्यमातून संशयित आरोपी आकाश झुम्मा चौधरी (२८) याला ताब्यात घेऊन त्याच्याकडे चौकशी केली असता ह्या गुन्ह्यातील मुख्य सूत्रधार मुलचंद चौथी विश्वनाथ, संदीपकुमार संसारबहादूर सिंग व त्यांचे साथ साथीदार सुशीलकुमार लटूरिसिंग चौहान, राहणार पी. एम. सी. चाळ दादोजी कोंडदेव स्टेडियम जवळ ठाणे, मनोज उर्फ पप्पू शिवप्रसाद शर्मा जयभोले चाळ दिवा, आकाश झुम्मा चौधरी, धर्मवीर गंगाराम पाशी  राहणार बैठक नगर झोपडपट्टी दिवा, भोलेसिंग अमरसिंग सिंह गणेशनगर दिवा, सत्तमसिंग श्रीशिवशंकर शुक्ला  राहणार मनोज शर्मा झोपडपट्टी दिवा, सोनू उर्फ अमितसिंग रामप्रकाश सिंह राहणार गणेशनगर दिवा यांना  अटक करण्यात आली, त्यांच्या कडून चार गावठी कट्टे, 1 रिव्हॉल्व्हर व आठ जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली असे अप्पर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे यांनी पत्रकार परिषदेमध्ये सांगितले. आरोपींनी मुंब्रा येथील ज्वेलर्स दुकानाचा मालक दुकान बंद करून घरी जात असताना त्याच्या जवळील सोन्याच्या दागिन्यांची आणि रोख रक्कमेची बॅग खेचून चोरी करण्याचा प्रयत्न केला होता. त्यास मालकाने विरोध केला असता यातील आरोपीने  मालकाच्या डोक्यात आपल्याकडील बंदूक  डोक्यात मारून मारहाण केली होती. त्यावेळी मालकाला वाचविण्यासाठी नागरीक जमा झाले असता आरोपी हे हवेत गोळीबार करून पळून गेले. महात्मा नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी कारखान्यामध्ये सोन्याचे दागिने बनवण्याचे काम करीत असताना यातील आरोपी यांनी दुकानात प्रवेश करून फिर्यादी यांना रिव्हॉल्वरचा धाक दाखवून व  मारहाण करून 20 ग्राम सोन्याचे दागिने व 1, 30, 000/- रुपये रोख  रक्कम जबरीने चोरी केली होती. डायघर पोलीस ठाण्याच्या हद्दीत फिर्यादी व्यवसायाची 1, 85, 000/- रोख रक्कम घेऊन जात असताना या आरोपींनी रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून ही रक्कम लुटली होती. हिललाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी व्यवसायाची 80, 000/- रुपयांची रोख रक्कम घेऊन जात असताना आरोपींनी वरील रक्कम लुटली होती.  मुंब्रा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील फिर्यादी हे त्यांचे सोन्याचे दुकान बंद करून घरी जात असताना आरोपी यांनी चाकूचा धाक दाखवून त्यांच्याकडून 273 ग्राम वजनाचे सोन्याचे दागिने व  25, 000/- रुपये रोख लुटले होते. हे सगळे गुन्हे त्यांच्याकडे तपास केला असता उघड झाले आहेत. त्याचबरोबर त्यांनी ठाणे आयुक्तालयातील टेंभीनाका, जांभळीनाक ठाणे, कळवा मार्केट, टिटवाळा व इतर तीन परिसरामध्ये अशा प्रकारचे गुन्हे करण्याचा हेतूने टेहळणी करून पूर्व तयारी केली असल्याचे तपासात दिसून आले आहे. यांना अटक केल्यामुळे पुढे अजून होणाऱ्या गुन्ह्यांना प्रतिबंध झाला आहे. यातील आरोपी हे मुख्यत्वे ज्वेलर्सचे दुकानधारक व इतर व्यावसायिक हे त्यांचे दुकान बंद करून जात असताना त्यांच्यावर पाळत ठेवून त्यांच्याकडील मौल्यवान दागिने, रोख रक्कम लुटत असत. यासाठी ते प्रथम ज्या ठिकाणी गुन्हा करावयाचा आहे त्या ठिकाणाची रेकी करून नियोजन पूर्वक गुन्हा करत असत. ह्या टोळीस जेरबंद करून कळवा पोलिसांनी भविष्यात करणार असलेल्या जबरी चोरीच्या गुन्ह्यास प्रतिबंद केला आहे. ही कामगिरी पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर, सह पोलीस आयुक्त सुरेश मेखला, अप्पर पोलीस आयुक्त अनिल कुंभारे, पोलीस उपायुक्त संजय बुरसे, सहाय्य्क पोलीस आयुक्त रमेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली कळवा पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शेखर बागडे, पोलीस निरीक्षक तुकाराम पोवळे, पोलीस निरीक्षक सचिन गावडे, सहाय्य्क पोलीस निरीक्षक अशोक भंडारे, पोलीस उपनिरीक्षक शिरीष यादव, संजय पाटील व कळवा पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण पथकाचे कर्मचारी यांनी केली आहे.

टॅग्स :DacoityदरोडाPoliceपोलिसArrestअटकthaneठाणेmumbraमुंब्रा