शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

Dabholkar Murder Case: परदेशी पाणबुड्यांनी शोधले अरबी समुद्रातले पिस्तूल; येणार ७.५ कोटींचा खर्च

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 17:04 IST

Dabholkar Murder Case : या हत्येत वापरलेली एक पिस्तूल सीबीआयने जप्त केली आहे.

ठळक मुद्देशवविच्छेदन अहवालात असलेल्या माहितीच्या आधारे बॅलिस्टिक तज्ज्ञ पिस्तुलाची पाहणी करणार आहेत,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे.दाभोलकरांच्या हत्येमध्ये खरंच हे वापरलं गेलं होतं का हे तपासण्यासाठी पिस्तूल फॉरेन्सिकला पाठविण्यात आले आहेत.

मुंबई - ऑगस्ट 2013 मध्ये पुण्यात अज्ञातांनी गोळ्या झाडून अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या केली होती. या हत्या प्रकरणी केंद्रीय अन्वेषण विभागाला (सीबीआय) महत्वपूर्ण पुरावा सापडला आहे. या हत्येत वापरलेली एक पिस्तूल सीबीआयने जप्त केली आहे. अरबी समुद्रातून नॉर्वेच्या पाणबुड्या, जलतरणपटू आणि तंत्रज्ञानाच्या मदतीने हे पिस्तूल शोधण्यात आलं असल्याची माहिती सीबीआयच्या सूत्रांनी दिली.दाभोलकरांच्या हत्येमध्ये खरंच हे वापरलं गेलं होतं का हे तपासण्यासाठी पिस्तूल फॉरेन्सिकला पाठविण्यात आले आहेत. ऑगस्ट २०१९ मध्ये सीबीआयने पुणे कोर्टाला माहिती दिली होती की, शस्त्राचा शोध घेण्यासाठी ठाण्याजवळील खारेगाव खाडीजवळील समुद्रात शोध घेणं आवश्यक आहे. कान, नाक आणि घसा (ईएनटी) सर्जन वीरेंद्र तावडे, वकील संजीव पुनाळेकर, विक्रम भावे, शरद कळस्कर आणि सचिन अंदुरे यांच्यासह सात जणांना दाभोलकर हत्येचा प्रमुख आरोपी म्हणून सीबीआयने अटक केली. मॉर्निंग वॉकला गेलेले असताना दाभोलकर यांची हत्या करण्यात आली. अनेक दिवस शोध घेतल्यानंतर आम्हाला पिस्तूल सापडलं आहे. शवविच्छेदन अहवालात असलेल्या माहितीच्या आधारे बॅलिस्टिक तज्ज्ञ पिस्तुलाची पाहणी करणार आहेत,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली आहे.सीबीआयने या  दुबईतील एनव्हिटेक मरीन कन्सल्टंट्सने शस्त्र शोधण्यासाठी आपली यंत्रणा नॉर्वेहून मागवली होती. ‘टोपोग्राफिकल अँड लेव्हल सर्व्हे’ नावाच्या एका सर्वेक्षण अहवालात भाग म्हणून खारेगाव खाडीजवळील परिसर शोधण्यासाठी तज्ज्ञांनी लोहचुंबकाचा वापर केला, त्यामध्ये समुद्र तळाशी आणि गाळ खोलीच्या पातळीची तपासणी केली, अशी सूत्रांनी माहिती दिली. या सर्वेक्षणातील भाग म्हणून इलेक्ट्रॉनिक डिस्टन्स मेजर, अँगल मेजरमेंट आणि लेव्हल मेजरमेंटसारख्या अनेक पद्धती वापरल्या गेल्या, असेही त्यांनी सांगितले.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरण : आरोपी विक्रम भावेचा जामीन पुणे सत्र न्यायालयाने फेटाळला

 

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरण: शस्त्र नष्ट करण्याचा सल्ला पुनाळेकरांकडूनच

राज्य सरकारकडून परवानगी मिळण्यापासून ते पर्यावरणीय परवानगीपर्यंत सीबीआय यंत्रणा संपूर्ण कारवाईत व्यस्त होती. अगदी नॉर्वेहून यंत्रसामुग्री आणण्यासाठी सुमारे ९५ लाख डॉलर्सची कस्टम ड्युटीही माफ करण्यात आली. या तपासासाठी ७.५ कोटी खर्च अपेक्षित आहे. पुण्यातील दाभोलकर आणि कर्नाटकमधील गौरी लंकेश आणि कलबुर्गी या हत्या प्रकरणांचा संबंध असल्याने सीबीआय आणि कर्नाटक आणि महाराष्ट्र दहशतवादविरोधी पथके (एटीएस) संयुक्तपणे तपासाचा खर्च वाटून घेण्याची शक्यता आहे.

दाभोलकर हत्या प्रकरणातील आरोपीचे वकील वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी लोकमतशी बोलताना सांगितले की एप्रिलपर्यंत किंवा पुढील 10 दिवसांत याप्रकरणी खटला सुरू होईल अशी अपेक्षा आहे. हा तपास कधी झाला याबाबत मला माहित नाही. विशेष म्हणजे हा शोध एक वर्षापासून सुरु होता. याबाबत किंचितही माहिती नव्हती. मात्र, कोर्टात पुढे सुनावणीदरम्यान सीबीआयच्या या तपासाबाबत कळेल. 

टॅग्स :Narendra Dabholkarनरेंद्र दाभोलकरCBIगुन्हा अन्वेषण विभागthaneठाणेMumbaiमुंबईMurderखून