शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

सायबर गुन्हेगारांनी दोघांना १ कोटीला गंडवले, ट्रेडिंगसह अटकेच्या भीतीने फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2024 14:48 IST

नेरूळ परिसरात राहणाऱ्या डॉक्टरला ट्रेडिंगबद्दल ऑनलाईन माहिती मिळाली होती. त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून अधिक नफा कमवण्याच्या उद्देशाने त्यांनी ६८ लाख रुपये भरले होते.

नवी मुंबई : सायबर गुन्हेगारांनी दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये दोघा जणांची ऑनलाईन तब्बल एक कोटी रुपयांची फसवणूक केली. एका व्यक्तीची ट्रेडिंगच्या बहाण्याने फसवणूक केली असून, दुसऱ्या व्यक्तीला कारवाईची भीती दाखवून लुटले. याप्रकरणी सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेरूळ परिसरात राहणाऱ्या डॉक्टरला ट्रेडिंगबद्दल ऑनलाईन माहिती मिळाली होती. त्यांच्या आश्वासनांवर विश्वास ठेवून अधिक नफा कमवण्याच्या उद्देशाने त्यांनी ६८ लाख रुपये भरले होते. मात्र, दिलेली मुदत उलटल्यानंतर त्यांनी नफ्याची रक्कम काढण्याचा प्रयत्न केला असता त्यांना ती मिळाली नाही. यावरून फसवणूक झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

अटकेची धमकी कोपरखैरणे परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला सीबीआयकडून अटक करण्याची धमकी दिली होती. त्यांचा लाँड्रिंग गुन्ह्यात सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता. यामध्ये अटक टाळायची असल्यास पैशाची मागणी करून ५० लाख रुपये उकळले. त्यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. दोन्ही गुन्ह्यांबाबत सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. 

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमPoliceपोलिस