शहरं
Join us  
Trending Stories
1
“बेस्ट निवडणुकीत हसे करून घेतले, ब्रँडचा बँड वाजला”; CM फडणवीसांची ठाकरे बंधूंवर बोचरी टीका
2
“लिहून घ्या, काही झाले तरी आता मुंबईत...”; CM फडणवीसांनी मुंबई मनपा निवडणुकीचे रणशिंग फुंकले
3
Asia Cup 2025 : बांगलादेशनं मॅच जिंकली; अफगाणिस्तानला अजूनही स्वबळावर बाजी पलटण्याची संधी, पण...
4
'आपण दहशतवादी नाही… पाकिस्तानसाठी लढलो'; काय म्हणाला जैश कमांडर? भारताविरुद्धही ओकली गरळ
5
West Indies Squad For India Test Series : दिग्गजाच्या पोराला संधी; माजी कर्णधाराचा पत्ता कट
6
लाखो लोकांची फसवणूक, दीड वर्षांपासून फरार; अखेर ‘ज्ञानराधा’च्या अर्चना कुटे यांना अटक
7
७ तास चालली चर्चा, भारतावर लादलेला ट्रम्प टॅरिफ अमेरिका कमी करणार? पाहा, बैठकीत काय झाले...
8
दोन मुंबईकरांसोबत नेट प्रॅक्टिस करताना दिसला हिटमॅन रोहित शर्मा; फोटो व्हायरल
9
“सध्याचे वातावरण सरकारला पोषक नाही, पराजयाच्या भीतीने निवडणुका पुढे ढकलल्या”: विजय वडेट्टीवार
10
BAN vs AFG : 'चमत्कारी' खानचा हिट शो! भुवीचा विक्रम मोडला; हार्दिक पांड्यालाही संधी, पण...
11
म्युच्युअल फंड असावा तर असा...! ₹10000 ची SIP गुंतवणूक ₹1.79 कोटींवर पोहोचली, गुंतवणूकदारांना केलं मालामाल
12
इस्रायलचा येमेनच्या बंदरावर मोठा हवाई हल्ला, हुथी बंडखोरांचा दावा!
13
‘भारताने अमेरिकेच्या मध्यस्थीचा प्रस्ताव नाकारला’, पाकिस्तानने केली ट्रम्प यांच्या दाव्याची पोलखोल
14
IND vs PAK मॅचनंतर वातावरण तापलंय! बॉयकॉटची धमकी देणाऱ्या पाक संघानं घेतला हा निर्णय
15
जीएसटीत कपात अन् बँकांत गर्दी...! लोक कार लोन रद्द करू लागले, काय आहे कारण...
16
'या' मुस्लीम देशावर मोठा हल्ला करण्याच्या तयारीत इस्रायल, दिला बंदरं रिकामी करण्याचा अल्टीमेटम!
17
कोराडी परिसरात पर्यावरण पर्यटन प्रकल्पाला प्रतिवर्ष १ रूपये भाडे तत्वावर जमीन मंजूर
18
“सत्तेत नसूनही काँग्रेसकडून तरुणांच्या हाताला काम, प्रत्येक जिल्ह्यात रोजगार मेळावा”: सपकाळ
19
मालेगाव ब्लास्ट प्रकरण : साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्यासह ७ जणांच्या निर्दोष मुक्ततेविरोधात उच्च न्यायालयात सुनावणी, आली मोठी अपडेट
20
केवळ ₹11,000 मध्ये आपली बनवा 'ही' नवी ढासू SUV, 52 भाषांसह AI असिस्टंन्ट अन् बरंच काही;  कंपनीनं सुरू केली बुकिंग

'असा' होतो सायबर हल्ला... आपला मोबाईल, पीसी सांभाळा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2018 21:40 IST

भारतासह शंभराहून अधिक देश सायबर  हल्ल्याचे शिकार 

भारताची अग्रगण्य देशांच्या यादीत नोंद व्हावी तसेच महासत्ता बनण्यासाठी एकीकडे सरकार कॅशलेस व्यवहारांसाठी आग्रह धरत असताना. दुसरीकडे मात्र, सायबर सुरक्षेबाबत  कमालीची अनास्था दिसून येत आहे. सायबर गुन्ह्यांपासून देशाची आर्थिक राजधानी मुंबईला सुरक्षित ठेवण्यासाठी विशेष सायबर पोलिसांचे विभाग स्थापन करण्यात आले. मात्र, त्यावेळी भविष्यातील सायबर गुन्हेगारीच्या आव्हानांचा विचार न केला गेल्यामुळे अशा गुन्ह्यांना आळा घालण्यात आज असंख्य अडचणी येत आहेत. वाढत्या सायबर गुन्ह्यांमध्ये रॅन्समवेअर्स व्हायरसद्वारे हल्ला करण्यात आल्याचे प्रमाण २० टक्क्यांनी वाढले आहे. भारतासह शंभराहून अधिक देश सायबर  हल्ल्याचे शिकार झाले आहेत.

संगणकाचा वापर हा सेफ टू युज, अनसेफ टू मिसयुज असा आहे. २१व्या शतकात तंत्रज्ञानाने जीवनाला गती दिली असली, तरी त्यासोबत नव्या गुन्हेगारीला, नव्या आव्हानांना जन्म दिला आहे. याची सर्वाधिक झळ देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला पोहोचत आहे. भारताने टप्प्याटप्प्याने स्वीकारलेल्या मुक्त आर्थिक धोरणामुळे विज्ञान आणि तंत्रज्ञानसह सगळ्याच गोष्टी भारतीयांच्या वाट्याला येऊ लागल्या आहेत. विकास दर वाढून भारताने तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात प्रगती केली आहे. त्यामुळेच अवघ्या काही वर्षात भारत जगातील सर्वांत मोठी बाजारपेठ ठरली आणि इथूनच भारतावर सायबर गुन्हेगारांनी विविध पद्धतीने हल्ला करण्यास सुरुवात केली. भारतात आता मोठ्या प्रमाणात सायबर गुन्हेगारांकडून सरकारी, संशोधन करणाऱ्या संस्था, खाजगी कंपन्या, बँका यांची संकेतस्थळे हॅक करून माहिती चोरण्याचे प्रमाण वाढू लागले आहे. तसेच प्रसिद्ध, महत्त्वाच्या व्यक्तीच्या बँक खात्यातून इंटरनेटच्या सहाय्याने लाखो रुपये पळवण्याचे प्रकारही सुरू झाले आहेत. ऐवढ्यावरच न थांबता हे सायबर चोरांनी आता सर्वसामान्यांनाही लक्ष करू लागले आहेत. भविष्यात हे आव्हान अधिकाधिक कठीण होणार आहे, यात तिळमात्रही शंका नाही. शहरात रॅन्समवेअर्स व्हायरसद्वारे हल्ला करण्याच्या प्रमाणात २० टक्क्यांनी वाढ झाली आहे. कालच वाशीत एमजीएम रुग्णालयावर सायबर हल्ला करण्यात आला. हे उदाहरण ताजे आहे. 

या झालेले पूर्वीचे रेन्समवेअर्स हल्ले

- मुंबईत मे २०१७ मध्ये सायबर चोरांनी रॅन्समवेअर्स व्हायरसद्वारे अनेकांना लक्ष केले होते. त्यावेळी महाराष्ट्र सायबर पोलिसांनी अशा तक्रारींसाठी विशेष हेल्पलाईन सुरू केली होती. त्यावर १२८२ फोन एकाच दिवसात आले होते. त्यामध्ये पोलिस अधिकार्यांचाही समावेश होता.  

- १७ मे २०१७ रोजी कल्याण-डोंबिवली महानगर पालिकेवर रेन्समवेअर्स व्हायरसचा हल्ला

- २६ मे २०१७ मंत्रालयावर रेन्समवेअर्स व्हायरसचा हल्ला

- २९ जून जेएनपीटी बंदरावरील दोन टर्मिनल्सवर रेन्समवेअर्स व्हायरसचा हल्ला

सायबर पोलिस ठाण्यांच्या प्रस्ताव अद्याप कागदावरच

एकीकडे सरकार कॅशलेस व्यवहारांसाठी आग्रह धरत असताना. सायबर सुरक्षेबाबत ठोस पावलं सरकारने उचलली आहेत का? असा सवाल उपस्थित होतो. वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी चार सायबर पोलिस ठाणी उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली त्याला वर्ष उलटले. वांद्रे येथे या पोलिस ठाण्यांसाठी जागा देखील निश्चित करण्यात आली. तरी नव्या सायबर पोलिस ठाण्याचा अद्याप ठावठिकाणा नाही. त्यासाठी १८६ नवीन पदांची निर्मिती करण्यात आली आहे. चार सायबर सेलसाठी दोन सहाय्यक पोलिस आयुक्त, २४ पोलिस निरीक्षक, ४० सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि १२० पोलिस शिपायांची नवीन पदे निर्माण करण्यास गृह विभागाने मान्यता दिली आहे. नवीन पदांच्या निर्मितीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवर वर्षाकाठी १४ कोटी ५९ लाख ५६ हजारांचा अतिरिक्त आर्थिक भार पडणार आहे.

रॅन्समवेअर्सचे प्रकार

* रॅन्सम ३२

* सेरबर

* क्रिप्टोजोकर

* क्रॅप्टिअर

* सीटीबी-लॉकर

* हायड्राक्रिप्ट

* ७ईव्ही३एम रॅन्समवेअर

 

अ‍ॅण्ड्रॉइड हल्ले

संगणकाप्रमाणेच मोबाइलवरील हल्लेही मोठय़ा प्रमाणात वाढले आहेत. २०१६च्या पहिल्या तिमाहीत क्विकहिलच्या प्रयोगशाळेत १७८ नवे मालवेअर्स आढळून आलेत. हे मालवेअर्स पसरण्याचे प्रमाण मागच्या वर्षीच्या तुलनेत ३० टक्क्यांनी वाढले आहे. यामध्येही रॅन्समवेअर्सचाही समावेश आहे.

अ‍ॅण्ड्रॉइड मालवेअर्स हे करतात

* नोटिफिकेशन बारमध्ये जाहिराती दाखवतात.

 *अनेक मालवेअर्स आपल्या मोबाइलमधील यंत्रणेचा वापर बिघडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपण जी क्रिया निवडतो ती न होता वेगळेच काही तरी ओपन होते.

* मोबाइल पेमेंट प्रणालीच्या माध्यमातून अनेकदा रॅन्समवेअर्स आपल्या मोबाइलमध्ये शिरकाव करतात. आपल्या ई - बँकिंगला धोका उत्पन्न होऊन पैश्यांची लूट होते. 

या सायबर हल्ल्यांपासून वाचण्यासाठी काय काळजी घ्याल?

* संगणकावर किंवा मोबाईलवर इंटरनेट वापरताना सुरक्षित संकेतस्थळांनाच भेट देणे.

* अनोळखी किंवा स्पॅममधील ई-मेल्स न पाहणे व ते तातडीने डिलीट करणे.

* अनोळखी स्रोतामधून अ‍ॅप किंवा कोणतीही फाईल्स किंवा माहिती स्वीकारू नये.

* संगणक किंवा मोबाईलमधील ऑपरेटिंग प्रणाली सतत अद्ययावत करत राहणे.

* अद्ययावत ऑपरेटिंग प्रणालीमध्ये जुन्या प्रणालीला त्रास देणाऱ्या मालवेअर्सवर तोडगा काढलेला असतो. त्यामुळे आपल्या संगणकामध्ये आणि मोबाईलमध्ये ऑपरेटिंग प्रणालीची ताजी आवृत्ती असावी.

* अचानक फूलस्क्रीनची जाहिरात येते. तुम्ही जोपर्यंत जाहिरातींवर क्लिक करत नाहीत तोपर्यंत बॅक किंवा होमस्क्रीनचे बटण वापरता येत नाही.

* अनेक प्रकारचे मालवेअर्स अ‍ॅपच्या माध्यमातून मोबाईलमध्ये शिरकाव करतात आणि छुप्या पद्धतीने माहिती चोरी करीत असतात.

* अनेक मालवेअर्स आपल्या मोबाईलमधील यंत्रणेचा वापर बिघडवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे आपण जी क्रिया निवडतो ती न होता वेगळेच काही तरी होते.

* मोबाईल पेमेंट प्रणालीच्या माध्यमातून अनेकदा रॅन्समवेअर्स आपल्या मोबाइलमध्ये शिरकाव करतात. त्यामुळे अतिशय सावधगिरीने ऑनलाईन बँकिंग बारकाईने करावे. 

http://www.lokmat.com/mumbai/phone-call-bank-be-careful/

टॅग्स :Crimeगुन्हाcyber crimeसायबर क्राइम