शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

केक कापून केला एक्स गर्लफ्रेंडवर हल्ला, ब्रेकअप नंतरची जवळीक पडली महागात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2022 18:40 IST

Attack on Ex-girlfriend : जन्मदिनाच्या पार्टीतला धक्कादायक प्रकार

नवी मुंबई : ब्रेकअप नंतरही पूर्व प्रियकराला जन्मदिनाच्या पार्टीत निमंत्रण देणे तरुणीला चांगलेच महागात पडले आहे. या तरुणाने पूर्व प्रियसीचा जन्मदिवस केक कापून साजरा केल्यानंतर तिला मारहाण करून डोके फोडले आहे. याप्रकरणी त्या तरुणावर सानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

मंगळवारी रात्री ११ वाजण्याच्या सुमारास सानपाडा येथील हॉटेल मध्ये हा प्रकार घडला आहे. वाशी परिसरात राहणारी तरुणी तिच्या मित्रांसोबत त्याठिकाणी जन्मदिनाची पार्टी करत होती. यावेळी तिच्या पूर्व प्रियकराने तिला फोन करून केक कापण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे तिने त्यालाही हॉटेल मध्ये बोलवले होते. यानुसार तो केक घेऊन आला असता, केक कापल्यानंतर त्याने तरुणीसोबत वाद घालण्यास सुरवात केली. यातूनच त्याने हॉटेल मध्ये टेबलावर ठेवलेल्या काचेच्या वस्तू तिच्या डोक्यात मारून जखमी केले. यामध्ये ती जखमी होऊन डोक्यातून रक्त येऊ लागले असता त्याने तिथून पळ काढला.

संशयातून प्रेयसीला दगडाने ठेचणाऱ्या प्रियकराची प्रकृती ठणठणीत, घेतला होता गळा चिरून

या घटनेनंतर तरुणीने रुग्णालयात उपचार घेऊन बुधवारी सानपाडा पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार वैभव ठाकूर याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वैभव व संबंधित तरुणी यांच्यात कॉलेज पासून मैत्री व नंतर प्रेम संबंध होते. परंतु त्याच्या भांडखोर स्वभावामुळे तिने त्याच्यापासून लांब राहण्याचा निर्णय घेतला होता. यानंतरही तो तिला मारहाण करत असल्याने सहा महिन्यांपूर्वी त्याच्यावर वाशी पोलीस ठाण्यात दोन एनसी देखील दाखल आहेत. त्यानंतरही  जन्मदिनाच्य दिवशी त्याने भेटण्याचा हट्ट केला असता, तिने त्याला पार्टीत बोलवल्याने हा प्रकार घडला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसNavi Mumbaiनवी मुंबई