शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

पैशाच्या व्यवहारातून झालेल्या भांडणातून तरुणाची गळा चिरून हत्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2019 21:16 IST

या प्रकरणी अ‍ॅण्टाॅप हिल पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत एकाला ताब्यात घेतले आहे.

ठळक मुद्देसोमवारी आनंद, फरार आरोपी आणि एक मित्र दारू पिण्यासाठी पॅटा गॅलक्सी बिल्डिंगच्या परिसरात बसले होते. प्रकरणी अ‍ॅण्टाॅप हिल पोलिस अधिक तपास करत आहेत. दारूच्या नशेत दोघांची व्यवहारावरून शाब्दिक बाचाबाची झाली.

मुंबई - वडाळा येथील अ‍ॅण्टाॅप हिल परिसरात एका ३८ वर्षीय तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे. आनंद नारायण असे या मृत व्यक्तीचे नाव असून अ‍ॅण्टाॅप हिल पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवला असून पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. या प्रकरणी अ‍ॅण्टाॅप हिल पोलिस अधिक तपास करत आहेत. धारावी परिसरात राहणाऱ्या आनंदचा टेम्पोचा व्यवसाय आहे. त्याच परिसरातील मारेकऱ्याला त्याने काही दिवसांपूर्वी पैसे उधारीवर दिले होते. दरम्यान सोमवारी आनंद, फरार आरोपी आणि एक मित्र दारू पिण्यासाठी पॅटा गॅलक्सी बिल्डिंगच्या परिसरात बसले होते. दारूच्या नशेत दोघांची व्यवहारावरून शाब्दिक बाचाबाची झाली. हा वाद इतका विकोपाला पोहचला की, आरोपीने चाकूने आनंदच्या गळ्यावर घातक वार करत पळ काढला. सोबत असलेल्या तिसऱ्या मित्राने रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या आनंदला स्थानिक नागरिकांच्या मदतीने सायन रुग्णालयात नेले. मात्र उपचारा दरम्यान आनंदचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. या प्रकरणी अ‍ॅण्टाॅप हिल पोलिसांनी हत्येचा गुन्हा नोंदवत एकाला ताब्यात घेतले आहे. तर आरोपीचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

टॅग्स :MurderखूनPoliceपोलिसMONEYपैसा