शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

ऐन दिवाळीत ग्राहकांची फसवणूक; पोलिसात ५० तक्रारी दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2019 20:09 IST

३ कोटींची फसवणूक; तपासकामी पोलीस पथक गठित

ठळक मुद्देतापर्यंत ५४ गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सुमारे २ कोटी ९३ लाख रुपयांची ही फसवणूक झाली आहे.सुनिलकुमार आणि सुधीशकुमार या दोघा दुकान मालकांसह व्यवस्थापक मनिष कुंडीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

डोंबिवली - जादा व्याजदर देण्याचे प्रलोभन दाखवत गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याप्रकरणी आतापर्यंत ५४ गुंतवणूकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून सुमारे २ कोटी ९३ लाख रुपयांची ही फसवणूक झाली आहे. तपासकामी एक पोलीस पथकही गठित करण्यात आले आहे.डोंबिवली पूर्वेतील मानपाडा रोड परिसरात गुडविन ज्वेलर्स नावाचे दुकान आहे. या दुकानात गुंतवणूक केल्यास १६ टक्के व्याजदर मिळत असल्याने अनेक गुंतवणूकदारांनी लाखोंची गुंतवणूक केली होती. मात्र, दिवाळीच्या तोंडावर ज्वेलर्सचे दुकान बंद राहील्याने चर्चेला तोंड फुटले. आणि, समाज माध्यमांवरही ज्वेलर्सचा मालक आपले सामान घेऊन पसार झाल्याचा संदेश फिरण्यास सुरुवात झाली. दोन दिवस वाट पाहूनही दुकान उघडण्यात आले नसल्याने अखेर गुंतवणुकदारांनी रामनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दिली. सदरचा तक्रार अर्ज दाखल होताच पोलिसांनी गुडविन ज्वेलर्सचे दुकान सील करीत सुनिलकुमार आणि सुधीशकुमार या दोघा दुकान मालकांसह व्यवस्थापक मनिष कुंडीविरोधात फसवणूकीचा गुन्हा दाखल केला आहे.

 

या तिघांच्या शोधासाठी एक पोलीस पथक तैनात करण्यात आले आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवसांमध्ये ५४ गुंतवणूकदारांनी तक्रार दिली असून आतापर्यंत २ कोटी ९३ लाख रुपयांची फसवणूक झाली आहे. - सुरेश आहेर (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, रामनगर पोलीस ठाणे)

टॅग्स :fraudधोकेबाजीPoliceपोलिसdombivaliडोंबिवली