शहरं
Join us  
Trending Stories
1
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
2
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
3
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
4
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
5
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
6
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 
7
सॅमसंगची मोठी घोषणा! तुम्ही तुमचा फुटलेला किंवा खराब झालेला फोन वर्षातून दोनदा दुरुस्त करू शकता
8
"उद्धव ठाकरे यांनी नेहमीप्रमाणे त्यांचे रडगाणे सुरु केले आहे"; देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
9
‘...हा तर अरविंद केजरीवाल यांच्या हत्येचा कट’, ‘आप’चा PMO वर सनसनाटी आरोप
10
... म्हणूनच काँग्रेसवाले आमच्या वाहनांवर हल्ले करतायत; कंगना यांचा गंभीर आरोप
11
प्लेऑफमध्ये KKR विरुद्ध SRHचं पारडं जड, अशी आहे आकडेवारी, थेट फायनल गाठणार की…
12
पंतप्रधान नेतन्याहू आणि हमास प्रमुखांना अटक होणार? ICC अटक वॉरंट जारी करण्याच्या तयारीत
13
मुंबईकर आजोबांना सलाम! नाकात नळी, मतदानाला आले, ओळखपत्र विसरले; पुढे...
14
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
15
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
16
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
17
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
18
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
19
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
20
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यात 57 टक्क्यांहून अधिक मतदानाची नोंद; 49 जागांसाठी मतदान

विकृतीचा कळस!  मालाडमध्ये कापली मांजरीची शेपटी; पोलिसांकड़ून आरोपीचा शोध सुरु

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2021 3:28 PM

Animal Abuse : एक महिन्यापूर्वीच दिला दोन पिल्लांंना जन्म

ठळक मुद्देमालाड पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे. अजय रमेश शहा (३६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.

मनीषा म्हात्रे

मुंबई : मालाडमध्ये नुकतेच दोन पिल्लांंना जन्म दिलेल्या मांजरीची एका विकृताने धारदार हत्याराने शेपटी कापल्याची धक्कादायक घटना मालाडमध्ये समोर आली आहे. मालाड पोलिसांनी अनोळखी व्यक्तीविरुद्ध गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे. अजय रमेश शहा (३६) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. शहा हे  मालाडच्या एस. व्ही. रोड येथील भाद्रण नगर परिसरात कुटुंबियांसोबत राहण्यास आहेत. त्यांच्या  घरी एक दोन वर्षाची मांजर ये जा करत असते. ते तिला खाण्यासाठी देतात.

त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार,  २९  एप्रिल रोजी ती मांजर सकाळी ८ च्या सुमारास घरी आली.  तिला नेहमी प्रमाणे खाण्यासाठी दिले. ती व्यवस्थित होती. तीच्यासोबत खेळलो तिचे व्हिडीओही काढले. अशात २ में रोजी दुपारी दीडच्या सुमारास घरी आली तेव्हा मांजरीची शेपटी कापलेली दिसून आली. जवळच्या प्राण्याच्या डॉक्टरकड़े नेले. तेथे कुठल्या तरी धारदार वस्तूने शेपटी कापल्याचे समोर आले. सोमवारी तिला पुन्हा डॉक्टरांकड़े घेऊन येण्यास सांगितले. 

प्राण्यासाठी काम करणारे पोलीस अधिकारी सुधीर कुडाळकर यांच्यापर्यंत हे प्रकरण येताच शहा यांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्यास सांगितले. तसेच पोलिसांशी बोलून याबाबत सहकार्य करण्यास सांगितले. त्यानुसार पोलिसांनी शहा यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंदवत अधिक तपास सुरु केला आहे. शहा यांनी मांजरीची शेपटी कापणाऱ्याविरुद्ध कड़क कारवाई करण्यास सांगितले आहे.

महिन्याभरापूर्वीच दिला दोन पिल्लांंना जन्म

कुडाळकर यांनी लोकमतला दिलेल्या माहितीत यात जखमी झालेल्या मांजरीने महिन्याभरापूर्वीच दोन पिल्लाना जन्म दिला होता. आरोपीच्या शोधासाठी आमची टीमही पाठपुरावा करत आहे. 

 

टॅग्स :Animal Abuseप्राण्यांवरील अत्याचारPoliceपोलिसMumbaiमुंबई