शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

विकृतीचा कळस! भिवंडीत एकतर्फी प्रेमातून तरुणाने चाकूने कापले तरुणीचे ओठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2021 16:25 IST

Crime News : तू मेरी नही हुई तो मै तुझे किसी और के लायक नही छोडूंगा अशी धमकी देखील या विकृत तरुणाने पीडित मुलीला दिली होती . 

ठळक मुद्देमुक्तार अंसारी याचे शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते.

नितिन पंडीत भिवंडी - एकतर्फी प्रेमातून विकृत तरुणाने साथीदाराच्या मदतीने चाकूने तरुणीचे ओठ कापल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात तरुणी जखमी झाल्याने तिला उपचारासाठी मुंबईच्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे . या हल्ल्याप्रकरणी आरोपी तरुणासह त्याच्या साथीदार मित्रावर शांतीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे .            

मुक्तार अब्दुल रहीम अंसारी ( वय २३ , रा . किडवाई नगर ) व शाहिद असे गुन्हा दाखल झालेल्या विकृत तरुणांची नावे आहेत. मुक्तार अंसारी याचे शांतीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहत असलेल्या एका तरुणीवर एकतर्फी प्रेम होते. मागील एक वर्षांपासून मुक्तार हा पीडित तरुणीला त्रास देत होता . मात्र मुलीचा या प्रेमाला विरोध होता. सदर मुलगी आपल्या प्रेमाला विरोध करते म्हणून मुक्तारने मुलीस अनेक धमक्यादेखील दिल्या होत्या . तू मेरी नही हुई तो मै तुझे किसी और के लायक नही छोडूंगा अशी धमकी देखील या विकृत तरुणाने पीडित मुलीला दिली होती .            

९ एप्रिल रोजी पीडित तरुणी सकाळी घराबाहेर पडली असता मुक्तार व त्याच्या साथीदाराने तिला गाठले. त्यावेळी मुक्तारच्या साथीदाराने मुलाला जबरदस्तीने पकडून ठेवले असता मुक्तारने मुलीचा नकाब खेचला व आपल्या हातातील चाकूने मुलीच्या ओठांवर वर करत ओठ कापले . या हल्ल्यात मुलीच्या ओठांना मोठी जखम झाली आहे . जखमी अवस्थेत मुलीला उपचारासाठी सुरुवातील शहरातील स्व इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र, जखम मोठी असल्याने पुढील उपचारासाठी तिला ठाणे येथील कळवा रुग्णालयात पाठविण्यात आले मात्र ओठांवर सर्जरी करण्याची आवश्यकता असल्याने डॉक्टरांनी तिला मुंबईच्या केईएम रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला असता सध्या तिच्यावर केईएम रुग्णालयात उपचार सुरु आहेत . दरम्यान याप्रकरणी मुक्तार व त्याचा साथीदार शाहिद या दोघांवर शांतीनगर पोलीस ठाण्यात विविध कलमांतर्गत सोमवारी गुन्हा दाखल करण्यात आला असून हे दोघेही आरोपी फरार झाले असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुप्रिया जाधव करीत आहेत.   

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडीPoliceपोलिसArrestअटक