शहरं
Join us  
Trending Stories
1
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
2
अरुणाचल हादरलं! HIV रॅकेट आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
3
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
4
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज
5
शंकर महादेवन यांनी खरेदी केलं चलतं-फिरतं लक्झरीअस हॉटेल! 'मसाज सीट'सह मिळतात या खास ५ स्टार सुविधा
6
अर्ध्या तासाच्या अंतराने कोसळले अमेरिकेचे हेलिकॉप्टर आणि विमान, दक्षिण चीन समुद्रात नेमकं काय घडलं?
7
वर्ल्डकप विजेता कर्णधार MS Dhoni केंद्रीय मंत्री रक्षा खडसेंच्या भेटीला, Video केला शेअर
8
अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या कार्यालयात 'वाजले की बारा' लावणी; सुनेत्रा पवारांचा थेट शहराध्यक्षांना कॉल
9
"व्हायरल होईल माहित होतं पण...", आर्यन खानच्या सीरिजमधील कॅमिओवर इम्रान हाश्मी म्हणाला...
10
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सेमीफायनलपूर्वी भारतीय महिला संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे आघाडीची फलंदाज स्पर्धेबाहेर 
11
निवडणूक आयोगाने देशात SIR ची घोषणा केली; या १२ राज्यांमध्ये होणार सुरुवात, असे असणार वेळापत्रक
12
घराणेशाहीचं राजकारण आता चालणार नाही; ठाकरे बंधूंवर अमित शाहांचा निशाणा, म्हणाले...
13
शेअर बाजार 'रॉकेट'! PSU बँक, रियल्टी आणि ऑटो स्टॉक्सला मागणी; पहा सेन्सेक्सच्या टॉप ५ कंपन्या
14
दोन जणांची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये लैंगिक छळ अन् 'HIV'चा उल्लेख...! अरुणाचल पोलिसांकडून फरार IAS अधिकाऱ्याला अटक 
15
कंगना रणौत भटिंडा न्यायालयात हजर, शेतकरी आंदोलनादरम्यान केलेल्या 'त्या' टिप्पणीबद्दल मागितली माफी
16
धक्कादायक! तूप, दारू आणि स्फोट...UPSC विद्यार्थ्याच्या लिव्ह-इन पार्टनरकडून भीषण हत्या
17
३ दिवसांपासून रॉकेट बनलाय 'हा' शेअर; सातत्यानं लागतंय अपर सर्किट, आता डिविडेंड देण्याचीही तयारी
18
Phaltan Doctor Death: रिलेशनशिप, भांडणं, प्रशांतला डेंग्यू झाल्याने पुन्हा आले एकत्र; कॉल्स, मेसेजचे स्क्रीनशॉट्स पोलिसांकडे
19
IND vs AUS: भारत की ऑस्ट्रेलिया, टी२० मध्ये कोणाचं पारडं जड? पाहा हेड टू हेड रेकॉर्ड!
20
VIDEO: 'तारेवरची कसरत'! मांजर विजेच्या तारेवरून चालत होती, अचानक लागली आग अन् पुढे...

Cruise Drugs Case :समीर वानखेडेंवर २५ कोटींचा बॉम्ब टाकणारा प्रभाकर साईल नेमका आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2021 19:01 IST

Cruise Drugs Case : आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत.

ठळक मुद्दे२२ जुलै २०२१ पासून गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून तो काम करत आहे. पंच असूनही आता कुटूंबीयांना धोका असल्याने  सर्व सत्य सांगत आहेत असं प्रभाकर साईलनं कबुली दिली.

बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा(Shahrukh Khan) मुलगा आर्यनला NCB ने मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात(Mumbai Cruise Drugs Rave Party) अटक केली आहे. या प्रकरणातील साक्षीदार किरण गोसावीचा बॉडीगार्ड प्रभाकर साईलने या घटनेला वेगळचं वळण दिलं आहे. NCB ने धमकावून १० कोऱ्या कागदावर सह्या घेतल्या. किरण गोसावी गायब झाल्यापासून आपल्या जीवाला समीर वानखेडेंकडून धोका असल्याचं म्हटलं आहे. मात्र, एनसीबीला अडचणीत आणलेले हे प्रभाकर साईल कोण आहेत? हे पाहुयात.

प्रभाकर साईल हा किरण गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून काम करत होता. आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. किरण गोसावी आणि सॅम डिसूझाचं मी फोनवरील संभाषण ऐकलं होतं. २५ कोटींचा बॉम्ब टाका. १८ कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील ८ कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ, असं या दोघांमध्ये संभाषण झाल्याचं आणि ऐकल्याचं साईल यांचा दावा आहे. 

नवाब मलिक म्हणतात, समीर वानखेडे यांना लक्ष्य केलं म्हणून मला धमकीचा फोन आला

Sameer Wankhede : समीर वानखेडे यांच्या नावाने बोगस ट्विटर अकाउंट

प्रभाकर राघोजी साईल (४०) हे अंधेरी पूर्वेकडे राहतात. ते किरण प्रकाश गोसावी यांचे बॉडीगार्ड आहेत. २२ जुलै २०२१ पासून गोसावीचा बॉडीगार्ड म्हणून तो काम करत आहे. ३० जुलै २०२१ रोजी तो गोसावीच्या ठाण्यातील हिरानंदानी इस्टेटमध्ये पहिल्यांदाच गेला होता. त्यावेळी इम्पोर्ट एक्स्पोर्टचा व्यवसाय असल्याचं गोसावीने त्यांना सांगितलं होतं. नंतर गोसावीने साईलची बॉडीगॉर्ड म्हणून नेमणूक केली होती. 

अनन्या पांडेने एनसीबीला दिला जबाब, म्हणाली, चॅटमध्ये ड्रग्स नाही तर सिगारेटबाबत बोलण झालं

क्रुझवर ड्रग्ज मिळाले की नाही याबाबत कल्पना नाही. परंतु या कोऱ्या कागदाचा वापर आर्यन प्रकरणात वापरण्यात आला. किरण गोसावी कुणासोबत तरी फोनवर बोलत होता. ज्यात २५ कोटींचा बॉम्ब ठेवल्याचा उल्लेख होता. ही डील १८ कोटींमध्ये सेटल होणार होती. ज्यातील ८ कोटी समीर वानखेडे यांना मिळणार होते. या संवादात शाहरुखची मॅनेजर पूजा दादलानीकडून पैसे घेण्याचा उल्लेख केला होता. पूजा फोन उचलत नव्हती असाही उल्लेख संवादात करण्यात आला होता.  

 

गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितलं. एनसीबीने १० कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना ५० लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या, असंही प्रभाकर साईलनी सांगितले. १ ऑक्टोबर रोजी रात्री ९.४५ वाजता गोसावीने मला फोन केला होता. तसेच २ ऑक्टोबरला साडेसात वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आलं. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. नंतर त्याच फोटोमधील व्यक्तींचे फोटो मला दाखवण्यात आले आणि ग्रीन गेटवर ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहिती देखील साईल यांनी दिली आहे.

एनसीबीच्या क्रूझवरील कारवाईवेळी एनसीबीचे अधिकारी, मी, किरण गोसावी आणि मनिष भानुशाली इतकेच उपस्थित होतो, अन्य कोणीही पंच उपस्थित नव्हते. माझ्या जीवाला धोका असल्याने सोलापूरला जाऊन राहिलो होतो. पंच असूनही आता कुटूंबीयांना धोका असल्याने  सर्व सत्य सांगत आहेत असं प्रभाकर साईलनं कबुली दिली.

टॅग्स :Sameer Wankhedeसमीर वानखेडेNCBनार्कोटिक्स कंट्रोल ब्यूरोDrugsअमली पदार्थAryan Khanआर्यन खान