शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

क्रूरतेच कळस! हुंड्यात कार न मिळाल्याने पती झाला हैवान; पत्नीला मारलं, मणक्याचं हाड तोडलं अन्... 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2025 18:24 IST

कार न मिळाल्याने दंतचिकित्सक पतीने आणि सासरच्या लोकांनी महिलेला बेदम मारहाण केली, ज्यात तिची मणक्याची हाडं मोडली.

उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमधून हुंड्यासाठी एका महिलेला अमानुष त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कार न मिळाल्याने दंतचिकित्सक पतीने आणि सासरच्या लोकांनी महिलेला बेदम मारहाण केली, ज्यात तिची मणक्याची हाडं मोडली. यानंतर पतीने तिला तीन तलाक देऊन घरातून हाकलून दिले.

पीडित महिलेची पोलिसांत तक्रारसआदतगंज पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणाऱ्या पीडित महिलेने तिचा पती शादाब अख्तर सिद्दीकी आणि सासरच्या मंडळींविरोधात हुंडाबळी आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. तिने आपल्या दिरावर छेडछाडीचाही आरोप केला आहे. मार्च २०२१ मध्ये तिचा विवाह कॅम्बेल रोड येथील दंतचिकित्सक शादाब अख्तर सिद्दीकीशी झाला होता, असे तिने पोलिसांना सांगितले.

हुंड्यासाठी छळ आणि शारीरिक-मानसिक त्रासपीडितेने दिलेल्या माहितीनुसार, तिच्या माहेरून लग्नात ५ लाख रुपये रोख, दागिने आणि इतर वस्तू हुंडा म्हणून देण्यात आल्या होत्या. असे असूनही, लग्नानंतर पती आणि सासरचे लोक सतत कारची मागणी करत होते. या मागणीवरून ते तिला दररोज शारीरिक आणि मानसिक त्रास देत असत. सासू आणि दीर तिला खराब जेवण देत असत आणि सतत टोमणे मारत असत, असेही तिने म्हटले आहे.

बेदम मारहाणीत मणक्याचे हाड मोडलेपीडितेने सांगितले की, तिच्या दिराने अनेक वेळा तिच्याशी अश्लील वर्तन केले. त्याला विरोध केल्यावर तो पळून गेला. याबाबत तिने पती आणि सासूकडे तक्रार केली असता, त्यांनी तिला गप्प राहण्याचा सल्ला दिला आणि तलाक देण्याची धमकी दिली. पतीने दारूच्या नशेत तिच्यासोबत जबरदस्ती केल्याचा आरोपही पीडितेने केला आहे. एका दिवशी त्याने तिला इतकी मारहाण केली की, तिच्या मणक्याचे हाड मोडले.

घरातून हाकलून दिले आणि 'तीन तलाक'या घटनेनंतर तिला आणि तिच्या लहान मुलीला घरातून हाकलून देण्यात आले, असा आरोप पीडितेने केला आहे. ती माहेरी असताना तिचा पती पुन्हा कारच्या मागणीसाठी तिच्या माहेरी आला. कुटुंबीयांनी त्याला समजावण्याचा प्रयत्न केला, पण तो ऐकला नाही आणि तीन वेळा तलाक बोलून निघून गेला. या प्रकरणी, महिलेच्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेशlucknow-pcलखनऊ