शहरं
Join us  
Trending Stories
1
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
2
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
3
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
4
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
5
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
6
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
7
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
8
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
9
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
10
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
11
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
12
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या
13
Viral Video : जंगलात राहणाऱ्या व्यक्तीने आयुष्यात पहिल्यांदा खाल्ला रसगुल्ला; प्रतिक्रिया पाहून तुम्हीही खूश व्हाल!
14
'या' सरकारी योजनेत ज्येष्ठांना ५ वर्षांत मिळेल १२,००,००० पेक्षा जास्त व्याज; कोण घेऊ शकतो लाभ?
15
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
16
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
17
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
18
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
19
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
20
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?

फाशी यार्डला क्रूरकर्मा वसंता दुपारेची प्रतिक्षा, फाशी लांबली!

By नरेश डोंगरे | Updated: July 29, 2023 22:01 IST

राष्ट्रपतींनी याचिका फेटाळल्यानंतर आरोपीची सर्वोच्च न्यायालयात धाव

नरेश डोंगरे, लोकमत न्यूज नेटवर्क, नागपूर: चार वर्षांच्या चिमुकलीचे अपहरण करून बलात्कार केल्यानंतर तिची निर्घृण हत्या करणारा क्रूरकर्मा वसंता दुपारे याच्या फाशीच्या शिक्षेच्या अंमलबजावणी संदर्भात अद्याप निर्णय झालेला नाही. राष्ट्रपतींकडून त्याचा दयेचा अर्ज फेटाळण्यात आला. त्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने तूर्त त्याची फाशी लांबली आहे. त्यामुळे नागपूर कारागृह प्रशासन आणि कारागृहातील फाशी यार्ड क्रूरकर्मा दुपारेच्या फाशीची तारीख कोणती ठरणार, त्याची प्रतिक्षा करत आहे.

क्रूरकर्मा दुपारे याने २००८ मध्ये एका चार वर्षीय चिमुकलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केला आणि नंतर तिची दगडाने ठेचून हत्या केली होती. या प्रकरणात त्याला सत्र न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. त्या शिक्षेविरोधात तो सर्वोच्च न्यायालयात गेला होता. सर्वोच्च न्यायालयाने त्याची याचिका मे २०१७ ला फेटाळून त्याला फाशी देण्याचा निर्णय बरोबर ठरवला होता. त्यानंतर त्याने दयेची याचिका सादर केली होती. राष्ट्रपती द्राैपदी मुर्मू यांनी २८ एप्रिल २०२३ ला त्याची याचिका फेटाळून लावत त्याच्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले होते. परिणामी दुपारेला फासावर टांगले जाणार, हे स्पष्ट झाले होते. मात्र, त्याला कोणत्या तारखेला फाशी द्यावी, या संबंधाने निर्णय व्हायचा होता.

परिणामी नागपूर आणि राज्य कारागृह प्रशासन आदेशाची वाट बघत होते. दरम्यान, दिल्लीतील वकिलांचे एक पथक मे महिन्यात नागपूर कारागृहात आले. त्यांनी दुपारेची भेट घेतली. यानंतर राष्ट्रपतींनी दया याचिका फेटाळल्याच्या निर्णयाविरोधात पुन्हा सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका सादर करण्याचे सुतोवाच दुपारेंच्या वकिलांनी कारागृह अधिकाऱ्यांशी बोलताना केले होते. दरम्यान, २१ जुलैला कारागृह प्रशासनाला दुपारेच्या फाशी विरोधातील पुनर्विचार याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल केल्याचा निरोप मिळाला. त्यामुळे दुपारेची फाशी तूर्त लांबली आहे. आता नागपूर कारागृहातील फाशी यार्ड आणि कारागृह प्रशासन सर्वोच्च न्यायालयाचा निकालाची वाट बघत आहे.

याकूबच्या फाशीला आठ वर्षे पूर्ण

मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी आणि आंतरराष्ट्रीय दहशतवादी दाऊद इब्राहिम याचा साथीदार याकूब मेमन याला ३० जुलै २०१५ ला नागपूर कारागृहात फाशी देण्यात आली होती. तत्पूर्वी देशातील सर्वोच्च न्यायालयाचे दार मध्यरात्री उघडून न्यायालयात पहाटेपर्यंत या शिक्षेविरोधात युक्तीवाद झाला होता. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच असे घडले होते. या ऐतिहासिक घटनेला आता ८ वर्षे पूर्ण झाली आहेत.प्राथमिक तयारी झाली होती.

एप्रिल महिन्यात दुपारेच्या दयेचा अर्ज राष्ट्रपतींकडून फेटाळल्या गेल्यानंतर ३० जुलैच्या आत त्याला शिक्षा दिली जाईल, असा कारागृह प्रशासनाचा अंदाज होता. त्यामुळे शिक्षेच्या अंमलबजावणीची प्राथमिक तयारी स्थानिक अधिकाऱ्यांनी सुरू केली होती. मात्र, दुपारेच्या वकिलांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतल्याने या क्रूरकर्म्याची फाशी आणखी काही दिवस लांबली आहे. संबंधित वरिष्ठांकडून आदेश आल्यानंतर आवश्यक ती प्रक्रिया सुरू करून फाशीच्या निर्णयाची अंमलबजावणी केली जाईल. -वैभव आगे, अधीक्षक, नागपूर कारागृह

टॅग्स :nagpurनागपूर