शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

कोवळे हात वळताहेत गुन्हेगारीच्या वाटेवर, उच्चभ्रू मुलेही यादीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 23, 2020 07:40 IST

Crime News : झोपडपट्टी, मध्यमवर्गीय घरांसह उच्चभ्रू वस्तीतील मुलेही सहज गुन्हे करताना सापडत आहेत.

मुंबई : आर्थिक परिस्थिती, पालकांचे दुर्लक्ष, व्यसने त्यात नेटवर्किंगचे वाढते जाळे यात अनेक अजाण बालके गुन्हेगारीच्या वाटेकडे वळताना दिसत आहेत.झोपडपट्टी, मध्यमवर्गीय घरांसह उच्चभ्रू वस्तीतील मुलेही सहज गुन्हे करताना सापडत आहेत.  धक्कादायक बाब म्हणजे सर्वाधिक बालगुन्हेगार हे पालकांसोबत राहणारे आहेत. त्यामुळे पालकांनी वेळीच सतर्क होत पाल्याकडे लक्ष देणे गरजेचे बनले आहे.एनसीआरबीच्या अहवालातून देशातील बालगुन्हेगारी हा चिंतेचा विषय ठरत आहे. गेल्या वर्षीच्या आकडेवारीनुसार, बालगुन्हेगारीत दिल्लीपाठोपाठ मुंबईचा दुसरा क्रमांक लागतो आहे. २०१९ मध्ये मुंबईत ६११ गुन्ह्यांची नोंद झाली. २०१८ (८६३) आणि २०१७ (९१४)च्या तुलनेत हा आकड़ा कमी आहे. या गुन्हेगारीत १६ ते १८ वयोगटातील बालकांचे प्रमाण सर्वाधिक आहे. हत्या, वाहनचोरी, बलात्कार, चोऱ्या अशा एक ना अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अडकू पाहणाऱ्या बालकांना रोखणारी सामाजिक व्यवस्थादेखील लोप पावत आहे.  उच्चभ्रू समाजातील मुलेही गुन्हेगार म्हणून पुढे येत आहेत. बालगुन्हेगारीची अनेक कारणे असली, तरी आपल्याला दिसणाऱ्या कारणांचा योग्य वेळी शोध घेऊन बंदोबस्त केल्यास बालगुन्हेगारीची समस्या काही प्रमाणात आटोक्यात आणणे शक्य असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

कायदा काय सांगतो? n १८ वर्षांखालील व्यक्तीकडून गुन्हा घडल्यास त्याला आरोपी नाही तर बाल अपचारी म्हटले जाते. त्याच्यावर केस चालवली जाऊ शकत नाही. त्याच्यावर आरोप असलेल्या गुन्ह्याची चौकशी ज्युवेनाईल जस्टीस बोर्डासमोर केली जाते.n त्यांना जेलमध्ये टाकता येत नाही. जरी चौकशीत दोषी आढळले तरी जास्तीत जास्त तीन वर्षांपर्यंत सुधारगृहात पाठवण्याची तरतूद यात आहे.

सुधारित कायद्यानुसार १६ वर्षांवरील बाल अपचारी यांच्या गंभीर केसेस हत्या, बलात्कार या सत्र न्यायालयात चालवण्यात याव्यात अशी तरतूद आहे. बऱ्याच छोट्या गुन्ह्यांमध्ये बाल अपचारीला चौकशी न करता गुन्हा कबूल केल्यावर बॉण्ड भरून सोडून दिले जाते.  असे सुटल्यामुळे त्याचा वाईट परिणामसुद्धा बऱ्याचदा होत असतो. - ॲड. प्रकाश साळसिंगीकर, विशेष सरकारी वकील  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी