शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

अमानवतेची हद्द पार! कुत्रा भुंकला म्हणून संतापलेल्या तरुणाने चाकूने कापले, आता...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2022 20:57 IST

Inhumanity Case : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्याला मारल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले आणि प्राण्यांवर क्रूरतेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आता आरोपीची चौकशी सुरू आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतील कल्याणपुरी भागात एका तरुणाने अमानवतेच्या सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. रस्त्यावरील भटक्या कुत्र्याच्या भुंकण्याचा त्याला इतका राग आला की त्याने कुत्र्याला चाकूने भोसकले. आता त्याच्यावर गुन्हा दाखल करून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुत्र्याला मारल्याची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठले आणि प्राण्यांवर क्रूरतेच्या कलमान्वये गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. आता आरोपीची चौकशी सुरू आहे.

आरोपीने चौकशीत सांगितले की, येताना रस्त्यावरील कुत्रा अनेकदा भुंकत असे. हे पाहून तो खूप अस्वस्थ झाला आणि एके दिवशी कुत्रा पुन्हा भुंकला तेव्हा रागाच्या भरात त्याचा संयम सुटला आणि त्याने कुत्र्याला चाकूने भोसकले.

नोएडामध्येही असाच प्रकार घडला आहेयाच्या काही दिवसांपूर्वी नोएडामध्येही एका व्यक्तीने बेसबॉलच्या काठीने कुत्र्याला बेदम मारहाण केली होती. या आरोपात दिल्ली पोलीस हवालदार विनोद कुमार याला पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी हापूरचा रहिवासी असून तो सध्या नोएडातील सेक्टर 44 मध्ये राहत होता. त्यांनी सांगितले होते की, त्यांचा मुलगा कुत्र्याला घाबरत असे कारण जेव्हा तो तेथून बाहेर जायचा तेव्हा तो भुंकायचा. यानंतर स्थानिक लोक आणि कॉन्स्टेबलमध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली आणि कॉन्स्टेबलला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर प्राणी क्रूरतेच्या कलमान्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला होता.भटक्या कुत्र्यांची वाढती समस्या दिल्ली एनसीआर भागात भटक्या प्राण्यांची समस्या वाढत आहे. दिल्ली, नोएडा आणि गाझियाबादमध्ये भटक्या कुत्र्यांचाही त्रास झाला आहे, मात्र याकडे प्रशासनाचे लक्ष नाही. अशा परिस्थितीत अनेक वेळा हे भटके प्राणी अपघाताचे कारणही ठरतात.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdelhiदिल्लीPoliceपोलिसArrestअटक