शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने कोट्यवधींचा गंडा, ‘लिंक’पासून सावधान; खात्री करून गुंतवणूक करा

By जितेंद्र कालेकर | Updated: October 3, 2025 09:47 IST

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने गेल्या दोन महिन्यांमध्ये एक कोटींहून अधिक रक्कमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

जितेंद्र कालेकरलोकमत न्यूज नेटवर्क

ठाणे : शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीच्या आमिषाने गेल्या दोन महिन्यांमध्ये एक कोटींहून अधिक रक्कमेची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे. ठाणे आयुक्तालयाच्या हद्दीत हा गुन्हा घडला असून वाढत्या सायबर गुन्ह्यांमुळे पोलिसांचीही डोकेदुखी वाढली आहे. अशा सायबर ठगांचा शोध घेण्यासाठी पोलिसांकडून आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे. तरीही या गुन्ह्यांमध्ये वाढ होत असल्याने नागरिकांनीही अशा अनोळखी लिंक आणि व्हॉट्सॲपग्रुपवरील शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करताना सावधानता बाळगावी, असे आवाहन ठाणे पोलिसांनी केले आहे. 

बॅंकेचा अधिकारी भासवून भामटेगिरी शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक केल्यास जादा नफा मिळवून देण्याच्या आमिषाने वागळे इस्टेट येथील खासगी कंपनीतील अधिकारी उदय गहिने (४६) यांची सायबर भामट्यांनी १९ लाख २७ हजारांची फसवणूक केली. जुलै २०२५ मध्ये फेसबुक न्याहाळताना गहिने यांच्या मोबाइलवर शेअर मार्केटचे प्रशिक्षण घेण्याबाबत एक लिंक आली. त्यावरून त्यांना व्हॉट्सॲप ग्रुप जॉइन करण्यास सांगितले.  गुंतवणुकीवर दहा टक्के परतावा मिळेल, असे आमिष बँक अधिकारी भासवणाऱ्या भामट्याने त्यांना  दाखविले. योजनेला भुलल्यामुळे  त्यांनी ३ ऑगस्ट २०२५ रोजी ५० हजारांचे पेमेंट पाठविले. दुसऱ्याच दिवशी गुंतवणुकीवर ४,५०० हजारांचा नफा झाल्याचे भासविले.  नफा काढण्यासाठी त्यांना टॅक्स भरण्यास सांगितले.  अशा प्रकारे १९ लाख २७ हजार ८६० गुंतविले. त्यावर ३९ लाख ४० हजारांचा फायदा  दाखविला. प्रत्यक्ष रक्कम न मिळाल्याने त्यांनी २४ सप्टेंबर रोजी श्रीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला.

१२ लाख ८० हजारांची फसवणूकअशाच गुंतवणुकीच्या प्रलोभनातून ठाण्यातील व्यावसायिक योगेश नायर (रा. वाघबीळ) या व्यावसायिकालाही  १२ लाख ८० हजारांचा गंडा घातला. नायर यांना १९ ऑगस्ट २०२५ ते १६ सप्टेंबर २०२५ यादरम्यान  व्हॉट्सॲपवर शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्याबद्दलची जाहिरात दिसली. त्यावर क्लिक केल्यानंतर त्यांना ट्रेडिंग स्ट्रॅटेजिस ग्रुप १२ या ग्रुपवर सहभागी केले. खाते सुरू करण्यासाठी लिंक पाठवून त्यांच्याकडूनही रक्कम उकळण्यात आली.  त्यांनीही २३ सप्टेंबर रोजी कासारवडवली पोलिस ठाण्यात तक्रार केली. 

पाच हजारांमध्ये सात लाख लंपासशेअर मार्केटमध्ये जादा नफ्याच्या नावाखाली ठाण्यातील २६ वर्षीय तरुणीला ७ लाख ३२ हजारांचा गंडा घातला. एका हॉटेलसाठी अभिप्राय देण्याच्या बहाण्याने तिच्या इन्स्टाग्राम  आयडीवर जाहिराती आल्या. अंशकालीन नोकरीच्या आशेने तिने या जाहिरातीवर क्लिक केले. तिला पाच हजारांचा फायदा झाला. तिचीही अशीच फसवणूक झाल्याची तक्रार वर्तकनगर पोलिस ठाण्यात दाखल झाली. 

व्हॉट्सॲपचा होतोय गैरवापर व्हॉट्सॲपसारख्या प्लॅटफॉर्म्सचा वापर अशा फसवणुकीसाठी हमखास हाेताे.  व्हॉट्सॲप ग्रुपद्वारे शेअर मार्केटची माहिती देण्यात येते.  स्टॉक मार्केटकडे वाढता कल हेरून  स्कॅमर्स यूजर्सना व्हॉट्सॲप ग्रुपमध्ये आमंत्रित करतात. नफ्याची बतावणी करून समभाग खरेदी करण्यासही सांगण्यात येते. मोफत गुंतवणुकीच्या स्किल्स शिकवणे, झिरो नुकसान अशा गोष्टींचे दावे हाेतात. मोठा नफा होण्याचा दावा केल्याने गुंतवणूकदारही रस घेतात. अगदी दहा दिवसांमध्ये ५० टक्के नफ्याबद्दलही मेसेज असतात. गुंतवणूकदारांनी अशा फसवणुकीच्या जाळ्यात अडकू नये. अधिकृत सोर्सेसची पुष्टी करावी.  अनोळखी  लिंकवर क्लिक करणे टाळा, असा सल्ला ठाणे सायबर पोलिसांनी दिला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Share market investment lure: Crores lost; Invest cautiously after verifying links.

Web Summary : Thane citizens lost crores to share market investment scams via WhatsApp and fake links. Victims were lured with high returns, but lost money after paying taxes. Police urge caution, advising verification and avoiding unknown links.
टॅग्स :fraudधोकेबाजीCrime Newsगुन्हेगारी