शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

कोटीचे गोमांस तळेगावात जप्त, दोन जणांवर गुन्हा दाखल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2018 01:28 IST

अवैध गोमांस वाहतूक प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोन विविध ठिकाणी कारवाई करून कंटेनर आणि टेम्पोसह दोघांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे.

तळेगाव दाभाडे : अवैध गोमांस वाहतूक प्रकरणी तळेगाव दाभाडे पोलिसांनी दोन विविध ठिकाणी कारवाई करून कंटेनर आणि टेम्पोसह दोघांना तळेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे १ कोटी २५ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. यामध्ये सुमारे २९ टन वजनाचे ६५ लाख रुपये किमतीच्या गोमांसाचा समावेश आहे, महंमद अक्रम खान (वय २४, रा. दुमदुमा, ता. चालकोसा, जि. हजारीबाग, झारखंड), समीर हुसेन शेख (वय ३०, झारखंड) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यावर महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दरम्यान, महंमद खान याला वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता चार दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश वडगाव मावळ न्यायालयाने दिले आहेत. समीर शेख यास सोमवारी वडगाव मावळ न्यायालयात हजर करणार असल्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांनी सांगितले. याप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते रुपेश हनुमंत गराडे (वय ३२, रा धामणे, ता. मावळ) आणि शिवशंकर राजेंद्र स्वामी यांनी फिर्याद दिल. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक भानुदास जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रुपेश गराडे व त्यांचा मित्र शेखर गराडे शनिवारी (दि. २२) पहाटे सहाच्या सुमारास पुणे-मुंबई महामार्गावरील सोमाटणे टोलनाक्याजवळ आले असताना गोमांसाची वाहतूक करणारा कंटेनर (एमएच ४३-६४५८) आढळून आला. अधिक चौकशी केली असता चालक महंमद अक्रम खान याने सदर मांस मुळेगाव तांडा, हैदराबाद रोड, सोलापूर येथून भरला असल्याचे व न्हावाशेवा (मुंबई) येथे घेऊन जात असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलीस उपनिरीक्षक ज्ञानेश्वर बाजगिरे यांनी कार्यकर्त्यांच्या मदतीने कंटेनर पोलीस ठाण्यात आणून पुढील कारवाई केली. याच स्वरूपाची दुसरी कारवाई रविवारी उर्से टोलनाका येथे करण्यात आली. यात मानद पशुकल्याण अधिकारी शिवशंकर राजेंद्र स्वामी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून टेम्पो (एमएच १७ बीवाय ६२२) चालक समीर हुसेन शेख (वय ३२, रा. जुन्नर,जि.पुणे)याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.गोरक्षण समितीचे आणि बजरंग दलाचे संदेश भेगडे, प्रतीक भेगडे, प्रणव दाभाडे, शिवांकुर खेर, योगेश ढोरे, शिवशंकर स्वामी, गौरव पाटील, सचिन जवळगे, गौरव विटे, अभिजित चव्हाण, श्रीकांत कोळी, अक्षय कुडलकर, भास्कर गोलिया यांनी कारवाईत सहभाग घेतला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPuneपुणे