शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

हळदीतील वादातून सराईत गुन्हेगाराचा हवेत गोळीबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2019 20:27 IST

कोंढव्यातील घटना, दोन्ही गटातील २५ जणांना अटक

ठळक मुद्देजीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल

पुणे : हळदी समारंभात मद्यपान करुन आल्याने हाकलून दिल्याच्या रागातून झालेल्या वादात कोंढव्यात सराईत गुन्हेगाराने हवेत गोळीबार केल्याची घटना घडली़. याप्रकरणी दोन्ही गटांनी एकमेकांविरुद्ध फिर्याद दिली असून कोंढवापोलिसांनी एका गटातील २१ व दुसऱ्या गटातील चौघांना अटक केली आहे़. विनोद चिमुला असे हवेत गोळीबार करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे़. याप्रकरणी सलमा सलीम शेख (वय ३६, रा़ अंतुलेनगर, येवलेवाडी) यांनी कोंढवापोलिसांकडे फिर्याद दिली आहे़. त्यावरुन कोंढवा पोलिसांनी २१ जणांना अटक केली आहे़. तर, रवि धांडेकर च्या आईने दिलेल्या फिर्यादीवरुन चौघांना अटक केली आहे़.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रवी याचा मित्र विशाल मेश्राम याच्या बहिणीचे हळदी समारंभाचा कार्यक्रम ७ डिसेंबरला होता़. यावेळी रवी धांडेकर मद्यपान करुन आला होता़. दारुच्या नशेत तो नाचायला लागल्याने  मोहसीन आणि विशाल यांनी त्याला निघून जाण्यास सांगितले़. त्यावरुन त्यांच्यात वाद झाला होता़. या रागातून दुसºया दिवशी रविवारी रात्री नऊ वाजता सर्व जण मोहसीन याच्या घरी गेले़. त्यावेळी तो पाहुण्यांना सोडविण्यासाठी पुणे स्टेशनला गेला होता़. त्यांनी बिबवेवाडी येथील काही मुलांनाही ते घेऊन आले होते़. विशाल व मोहसीन न सापडल्याने त्यांनी वस्तीतील मुलांना मारहाण केली़. हिंमत असेल तर ये, अशी धमकी दिली़. याची माहिती मोहसीन शेख, विशाल मेश्राम हे अजय जमसंडी याला आमच्या वस्तीमधील मुलांना का मारले अशी विचारणा करण्यास रविवारी रात्री गेले होते़. त्यावेळी तेथे स्वप्नील धांडेकर, रवि धांडेकर, विनोद चिंमुला व त्यांचे १० ते १५ साथीदार आले़. त्यांनी मोहसीन शेख यास लाकडी दांडके, कोयता, लोखंडी रॉडने डोक्यात, शरीरावर वार करुन गंभीर जखमी केले़ त्याला सोडविण्यास आलेल्या सनी शिंदे, शाकीर शेख, अकबर शेख, श्रीदेवी मेश्राम यांनाही मारहाण करुन गंभीर जखमी केले़. यावेळी दोन्ही गटात तुफान हाणामारी झाली़ हे पाहून स्वप्नील याच्याकडील पिस्तुल घेऊन विनोद चिमुला याने हवेत गोळीबार केला़. गोळीबाराचा आवाज ऐकून सर्व जण पळून गेले़ . या घटनेची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली़. कोंढवा पोलिसांनी अजय जमसंडीसह २१ जणांना अटक केली आहे़. त्यांच्याविरुद्ध जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़. सध्या मोहसीन शेख, श्रीदेवी मेश्राम यांच्यावर ससून रुग्णालयात उपचार करण्यात येत आहे़. त्यांच्याविरुद्ध दिलेल्या फिर्यादीनुसार अकबर शेख, शाकीर शेख, सनी शिंदे, अदित्य पवार यांना अटक केली आहे़. या घटनेनंतर कोंढवा, येवलेवाडी परिसरातील बंदोबस्तात पोलिसांनी वाढ केली होती़. 

टॅग्स :KondhvaकोंढवाFiringगोळीबारCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस