शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

आर्थिक वादातून तरुणावर गोळीबार करणाऱ्या आरोपींना अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2019 17:13 IST

पैसे डबल करण्याच्या आमिषाने दोन दिवसापूर्वी पूर्वी खेडमध्ये तरुणावर गोळीबार करून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती.

दावडी : पैसे डबल करण्याच्या आमिषाने दोन दिवसापूर्वी पूर्वी खेडमध्ये तरुणावर गोळीबार करून प्राणघातक हल्ला झाल्याची घटना घडली होती. याबाबत खेड पोलीस ठाण्यात फिर्याद देण्यास कोणी तयार नव्हते. मात्र, खेड पोलिसांनी तपास यंत्रणा फिरवत ४८ तासात गुन्हेगारांना जेरबंद केले आहे.निलेश भास्कर टिळे (रा. रावेत, पिंपरी चिंचवड ) या तीस वर्षाच्या युवकावर गोळीबार करुन गंभीर केले असल्याची घटना कडूसकडे जाणाऱ्या वडगाव पाटोळे गावाच्या हद्दीत रविवारी (दि. ३१ )  घडली होती. निलेश यांच्यावर कशामुळे प्राणघातक हल्ला झाला. मात्र जखमी निलेश टिळे व त्याचे वडील भास्कर टिळे यांनी पोलिस फिर्याद देण्यास नकार दिला होता.ही घटना कशावरून घडली.याबाबत पोलीस यंत्रणाही ही संभ्रमात होती. याबाबत तक्रार देण्यास कोणीही पुढे आले नाही. मात्र, खेड पोलिसांनी तपासांची चक्रे फिरवत ३ आरोपीना अटक केली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार निलेश विठ्ठल घनवट (वय २७ ( रा.अंधेरी सातबंगला मुंबई  रामदास गबाजी शिंदे (वय २७ रा.गडद ता.खेड)  यांनी समिर सुरेश रेटवडे (रा.रेटवडी ता.खेड ) याच्या मदतीने कट रचुन बेकायदा बिगरपरवाना गावठी बनावटीचे पिस्तूल जवळ बाळगून दहा लाख रूपयाचे वीस लाख रुपये करून देतो. असे निलेश भास्कर टिळे (रा. रावेत, पिंपरी चिंचवड ) यास अमिष देऊन व बहाना करून समीर रेटवडे यांच्या सांगण्यावरून रामदास शिंदे याने गावठी रिव्हालवर मधुन एक गोळी फायर करून त्यास जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करून त्याचेकडील दहा लाख रुपये रोख रक्कम जबरीने चोरण्याचा प्रयत्न केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे वरील तीनही आरोपीना किवळे (ता खेड ) गावाचे हद्दीत गावठी कट्ट्यासह अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एक गावठी बनावटीचा स्टील बॉडीचा त्याचे बटाचे वरील बाजूस काळे रंगाचे प्लॅस्टीकचे  कव्हर असेलला व त्यास एक स्टीलचे मॅगझीन किंमत५ हजार रुपये, ४० हजार रुपायांची नंबर प्लेट नसलेली काळे पोपटी रंगाची एक मोटारसायकल जप्त करण्यात आली असल्याचे उपविभागीय पोलिस अधिकारी गजानन टोणपे ,खेड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अरविंद चौधरी यांनी सांगितले याबाबत पोलिस नाईक संजय नारायण नाडेकर यांनी खेड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  

टॅग्स :KhedखेडFiringगोळीबारArrestअटकCrime Newsगुन्हेगारी