शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यातील क्लबमध्ये भीषण आग, २३ जणांचा मृत्यू; सिलिंडर स्फोट झाल्याची शक्यता, CM कडून चौकशीचे आदेश
2
Indigo आज १५०० उड्डाणे घेणार, १३५ ठिकाणांना जोडणार; एअरलाइन्सनं जारी केले निवेदन
3
आजचे राशीभविष्य, ०७ डिसेंबर २०२५: आर्थिक लाभाची संधी पण नकारात्मक विचार दूर करणे हितावह राहील
4
‘स्थानिक’ निवडणुकीची रणधुमाळी; ‘हिवाळी’ अधिवेशन ठरणार वादळी; उद्यापासून नागपुरात प्रारंभ; विरोधकांचा चहापानावर बहिष्कार
5
क्रेडिट कार्डांच्या विळख्यात..! क्रेडिट कार्डवर राेख रक्कम उचलली तर काय हाेते?
6
हा हा हा... आमच्यासारखे तुम्हाला भांडता येते का...?
7
विमान तिकीट दरवाढीला केंद्राचा चाप, चौथ्या दिवशीही इंडिगोचा घोळ कायम
8
घोडबंदर मार्गावर आज ‘अवजड’ प्रवेशबंदी; मोठा पोलिस फौजफाटा तैनात, पण कोंडी टळणार का?
9
इंडिगोवर रेल्वेचा दिलासा : ३७ ट्रेनला ११६ अतिरिक्त डबे, मध्य आणि पश्चिम रेल्वे चालवणार ४९ विशेष फेऱ्या
10
डॉ. आंबेडकरांनी भारताच्या विविधतेला एकत्र बांधणारे संविधान दिले : राज्यपाल
11
राणीच्या बागेत झेब्रा, जिराफ, जॅग्वार, चिंपांझीसाठी लगबग..! ‘एक्झॉटिक झोन’साठी प्रक्रिया सुरू; १७ प्रदर्शिनी, सुविधा निर्माण करणार
12
SIR प्रक्रियेत मोठा घोटाळा समोर, चुकीची माहिती दिल्याचे उघड; नूरजहां, आमिर, दानिश विरोधात FIR
13
"तुमच्या मर्यादेत राहा..." ODI मालिका जिंकताच गंभीरनं काढला मनातला राग! तो नेमकं कुणाला अन् काय म्हणाला?
14
एकनाथ शिंदेंनी मुलाचे भरसभेत केले तोंडभरून कौतुक; म्हणाले, “श्रीकांत हे व्हिजन असलेले खासदार”
15
'यशस्वी' सेंच्युरी... 'रो-को'ची फिफ्टी! टीम इंडियानं दाबात जिंकली दक्षिण आफ्रिकेविरुद्धची वनडे मालिका
16
“कोणतीही तडजोड अमान्य, अशी कारवाई करू की...”; Indigo प्रकरणी केंद्र सरकारची कठोर भूमिका
17
वयाच्या ६७ व्या वर्षी २५ वर्षांच्या तरुणीशी लग्न; संशयास्पद मृत्यूनंतर सून म्हणते, "लग्नानंतर दररोज..."
18
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये मालिका गाजवणारा 'किंग' ठरला कोहली! तेंडुलकरचा 'महारेकॉर्ड' मोडला
19
"IndiGo चा गोंधळ, प्रवाशांना त्रास हे भाजपा सरकारच्या नाकर्तेपणाचं उदाहरण"; विरोधक कडाडले
20
Yashasvi Jaiswal Century : आधी कसोटी खेळला! मग टी-२० स्टाईलमध्ये साजरी केली वनडेतील पहिली सेंच्युरी
Daily Top 2Weekly Top 5

सोशल मीडियावर गुन्हेगारांचे जाळे, खरेदी-विक्रीच्या व्यवहारातून होते फसवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2020 00:21 IST

ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना घडत आहेत. डिस्काउंट ऑफरच्या बहाण्याने नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करण्यास भाग पाडून फसणूक होत आहेत.

- सूर्यकांत वाघमारे  नवी मुंबई : ऑनलाइन व्यवहाराच्या माध्यमातून फसवणुकीच्या घटना घडत आहेत. डिस्काउंट ऑफरच्या बहाण्याने नागरिकांना ऑनलाइन व्यवहार करण्यास भाग पाडून फसणूक होत आहेत. अशाच प्रकरणातून उलवे येथील महिलेने घराच्या हप्त्यासाठी जमवलेल्या साडेतीन लाखांवर अज्ञाताने डल्ला मारला आहे.लवे येथील कुटुंबाने नव्या घराच्या हप्त्यासाठी बँकेत साठवलेले साडेतील लाख रुपये गमवावे लागले आहेत. त्यांच्या १५ वर्षीय मुलाने सोशल मीडियावरून १० हजार रुपयांचा मोबाइल खरेदीसाठी अज्ञात व्यक्तीला ऑनलाइन पेमेंट केले, परंतु पैसे पोहोचले नसल्याचे सांगून, त्या अज्ञात व्यक्तीने त्याच्या आईच्या बँक खात्यातले साडेतीन लाख रुपये हडपले, तर घराचा हप्ता भरण्यासाठी ही महिला बँकेत गेली असता, खात्यात केवळ ६०० रुपये शिल्लक असल्याचे समजल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.अशाच प्रकारे वाशीतील महिलेला एका तरुणीने फोन करून, तुमच्या पतीची पॉलिसी संपली असून, तिचा हप्ता आजच ऑनलाइन भरल्यास दहा हजारांची सूट मिळेल, असे आमिष दाखविले.यानुसार, त्या महिलेने फोनवरील तरुणीने दिलेल्या अकाउंटवर ८८ हजार रुपये पाठविले होते. मात्र, अनेक दिवस होऊनही पैसे भरल्याची पावती न मिळाल्याने, त्यांनी पॉलिसी कंपनीच्या कार्यालयात जाऊन चौकशी केली असता, फसवणूक झाल्याचे उघड झाले.स्मार्टफोनमध्ये ऑनलाइन पेमेंटचे उपलब्ध असलेले पर्याय गुन्हेगारांच्या पथ्यावर पडत आहेत. सध्या फेसबुक, इंस्टाग्राम, ओएलएक्स व इतर सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वेगवेगळ्या वस्तू व साहित्यांची खरेदी-विक्री चालत आहे, परंतु सोशल मीडियावर विक्री करणारी व्यक्ती कोण? हे माहीत नसतानाही त्याला पैसे पाठविले जातात. परिणामी, काहींना आयुष्याची जमापुंजी गमवावी लागत आहे. त्यामुळे नागरिकांनी ऑनलाइन आर्थिक व्यवहार करताना खबरदारी घेण्याच्या सूचना सातत्याने पोलिसांकडून होत आहेत. त्यानंतरही अज्ञान असलेल्या व्यक्ती गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत.

टॅग्स :Social Mediaसोशल मीडियाCrime Newsगुन्हेगारीcyber crimeसायबर क्राइम