शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

सराईत गुन्हेगाराला गावठी पिस्तुलासह अटक; दहशतवादविरोधी पथक व नारायणगाव पोलिसांची कारवाई 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2020 17:19 IST

एक गावठी पिस्तूल एक जिवंत काडतुस हस्तगत

नारायणगाव : निसर्ग चक्रीवादळाच्या तडाख्यात पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथक (अळर) व नारायणगावपोलिस ठाणे यांनी संयुक्तरित्या कारवाई करत कावळ पिंपरी येथील सराईत गुंडाला गावठी पिस्तुलासह अटक केली.  पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी कक्ष (अळर) चे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते हे आपल्या पथकासह नारायणगाव परिसरात गस्त करत असताना  दहशतवाद विरोधी कक्षाचे राजू पवार व किरण कुसाळकर यांना मिळालेल्या बातमीच्या आधारे सराईत गुंड रोहिदास बाबुराव पाबळे (वय ३७ रा.कावळ, पिंपरी ता. जुन्नर) यांच्याकडे गावठी पिस्तूल असल्याची माहिती मिळाली. दहशतवाद विरोधी कक्ष या पथकाने नारायणगाव ठाण्याच्या मदतीने कावळ पिंपरी येथे छापा टाकून पाबळे याला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक गावठी पिस्तूल एक जिवंत काडतुस हस्तगत केले. पाबळे याने बेकायदेशीर, बिगरपरवाना शस्त्र बाळगले म्हणून नारायणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाबळे याचेवर यापूर्वी खुनाचा प्रयत्न , मारहाण यासारखे गुन्हे दाखल आहेत .

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर पोलीस अधीक्षक विवेक पाटील, जुन्नर उपविभागीय पोलिस अधिकारी श्रीमती दीपाली खन्ना , स्थानिक गुन्हे शाखा विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे पाटील , दहशतवाद विरोधी कक्षाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अर्जुन मोहिते, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक राजू पवार , पोलीस नाईक विशाल भोरडे, किरण कुसाळकर , मोसिन शेख ,  नारायणगाव पोलीस ठाण्याचे योगेश गारगोटे, सचिन कोबल या पथकाने केली .

टॅग्स :narayangaonनारायणगावCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसArrestअटक