शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींच्या मृतदेहाची DNA चाचणीनं ओळख पटली; संध्याकाळी कुटुंबाला सोपवणार मृतदेह
2
"हे गोंधळ पसरवण्यासारखे ..."; एअर इंडियाच्या विमान अपघातावर तुर्कीचे विधान; मेंटनन्स कंपनीवर स्पष्टीकरण दिले
3
तिरुअनंतपुरममध्ये ब्रिटिश लढाऊ विमान F-35 चे आपत्कालीन लँडिंग; धोकादायक विमान भारतात का आले?
4
नीट-यूजीमध्ये महाराष्ट्रातील सव्वा लाख विद्यार्थी उत्तीर्ण!
5
पार्टीसाठी अपहरण करुन अज्ञाताची केली हत्या; एकाच्या चुकीने सात अल्पवयीन मुले ताब्यात
6
"आता तरी 'चोकर्स' म्हणू नका..."; WTC Finalच्या विजयानंतर भावूक झाला शतकवीर एडन मार्करम
7
Donald Trump : "जर आमच्यावर हल्ला केला तर अमेरिकन सैन्य..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला कडक इशारा
8
केदारनाथहून परतताना कोसळलं हेलिकॉप्टर; महाराष्ट्रातल्या जयस्वाल दाम्पत्यासह २ वर्षाची चिमुरडी ठार
9
Israel Iran War: इराणचा ड्रोन, क्षेपणास्त्रांनी प्रतिहल्ला; इस्रायलचा हल्ले निकामी 
10
माळेगाव कारखान्याचा चेअरमन मीच होणार..! भर सभेत अजित पवार नेमकं काय म्हणाले ?
11
Bachchu Kadu: ...तर आम्ही मंत्रालयात घुसणार, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा!
12
खुल्लम खुल्ला प्यार... 'चॅम्पियन' एडन मार्करमने भरमैदानात सर्वांसमोर पत्नीला केलं किस, Photo व्हायरल
13
पहिली गोळी मांडीवर अन् शाहरुख आडवा झाला; असा होता एन्काऊंटरचा थरार...
14
कोल्हार- घोटी राज्यमार्गावर भीषण अपघात; तीन ठार, दहा जखमी
15
पालकांच्या कष्टाची जाण! मराठी अभिनेत्याने आई-बाबांसाठी घेतलं नवीन घर, चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव
16
Maharashtra Rains: राज्यात पावसाचा जोर वाढला, वीज पडून ९ जणांचा मृत्यू; ७ जण भाजले!
17
हेलिकॉप्टर पायलट बनायचंय? किती खर्च, किती पगार? जाणून घ्या A to Z माहिती!
18
Ahmedabad Plane Crash : आईच्या शब्दाखातर 'तो' थांबला अन् विमान अपघातातून जीव वाचला; ऐनवेळी नेमकं काय घडलं?
19
Israel–Iran War : इस्त्रायल-इराण युद्धात जग दोन गटात विभागले! 'या' मुस्लीम देशांनी घेतली इराणची बाजू; भारत कोणासोबत?
20
BCCI ने जाहीर केलं 'टीम इंडिया'चं पुढल्या वर्षीचं वेळापत्रक, रोहित-विराट 'या' तगड्या संघाविरूद्ध मैदानात उतरणार

मंदिरात चोरी व घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगारास अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 17:35 IST

आरोपीकडून गुन्हयात चोरी केलेला १ लाख ३२ हजारांचा मुदेमाल हास्तगत केला आहे. आरोपीने विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

मंगेश कराळे

नालासोपारा - मंदिरात चोरी व घरफोडी करणाऱ्या सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात विरारच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलिसांना यश मिळाले आहे. आरोपीकडून ५ गुन्ह्यांची उकल करून चोरी केलेला १ लाख ३२ हजारांचा मुद्देमाल हस्तगत केल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी प्रवीण बनगोसावी यांनी बुधवारी दिली आहे. 

विरारच्या फुलपाडा गाव येथील डोंगरात बारोंडा देवीचे जागृत स्थान आहे. येथील मंदिरात ५ ते ६ जून दरम्यान चोरट्यांनी मंदिरातील खिडकीचे ग्रीन तोडून आत प्रवेश करत दोन मूर्तींच्या गळ्यातील दोन मंगळसूत्र दोन नाकातील नथ व दानपेटीतील पैसे असा २५ हजार ५०० रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेला होता. विरार पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला होता. सदर गुन्हा गंभीर स्वरुपाचा असल्यामुळे या गुन्हयांची लवकरात लवकर उकल करण्यासाठी वरिष्ठांनी गुन्हे प्रकटीकरण पथकातील अधिकारी व अंमलदार यांना सुचना व मार्गदर्शन केले होते. त्या अनुषंगाने गुन्हयांचा तपास गुन्हे प्रकटीकरण शाखेने सुरु केला होता.

नमुद गुन्ह्रातील आरोपीचा शोध घेण्याकरिता घटनास्थळच्या आजुबाजुच्या परिसरात तपास व मिळालेल्या माहितीच्या आधारे फुलपाडा परिसरात सलग दोन दिवस सापळा रचून आरोपी राहुल रामचंद्र पाटील (२६) याला ताब्यात घेऊन गुन्ह्याचा अनुषंगाने तपास करून मंदिराचा गुन्हा आरोपीने केल्याचे तपासात निष्पन्न केले. आरोपीकडून गुन्हयात चोरी केलेला १ लाख ३२ हजारांचा मुदेमाल हास्तगत केला आहे. आरोपीने विरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत केलेल्या पाच गुन्ह्यांची उकल करण्यात आली आहे.

सदरची कामगिरी पोलीस उपायुक्त सुहास बावचे, सहाय्यक पोलीस आयुक्त रामचंद्र देशमुख यांचे मार्गदर्शनाखाली विरारचे  वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) दिलीप राख, गुन्हे प्रकटीकरण शाखेतील पोलीस उपनिरीक्षक संदेश राणे, पोलीस हवालदार सचिन लोखंडे, संदीप जाधव, इंद्रनिल पाटील, विशाल लोहार, संदीप शेरमाळे, योगेश नागरे, मोहसिन दिवान, सचिन बळीद, बालाजी गायकवाड, दत्तात्रय जाधव, प्रफुल सोनार यांनी केली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी