शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

मोबाइलवरून झाला गुन्ह्याचा उलगडा, भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी आरोपींना दिली होती सुपारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 17, 2021 00:08 IST

Crime News : भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सुपारी देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यासह चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडले आहे, तर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करणाऱ्या तीन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.

नालासोपारा : मोरेगावात रविवारी रात्री मुख्य रस्त्यावर झालेल्या गोळीबार प्रकरणाचा मोबाइलवरून छडा लावण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सुपारी देणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्यासह चाकूने हल्ला करणाऱ्या आरोपीला पकडले आहे, तर गोळीबार आणि कोयत्याने हल्ला करणाऱ्या तीन फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहे.नालासोपाऱ्याच्या मोरेगाव येथील पाणीपुरी, भेलपुरीचे दुकान असलेला राजकुमार ऊर्फ बैल गुप्ता (३२) आणि मोबाईलचे दुकान असलेला बली गुप्ता या दोघांवर दुचाकीवरून आलेल्या तीन आरोपींनी कोयता, चाकूने राजकुमार गुप्तावर वार करून गावठी कट्यातून चार गोळ्या झाडल्या होत्या.घटनास्थळावरून मिळालेल्या आरोपींच्या मोबाईलवरून क्राईम युनिट तीनचे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख आणि त्यांच्या टीमने उलगडा केला आहे. चाकूने वार करणाऱ्या सलमान याला पोलिसांनी ट्रॉबे येथून सोमवारी रात्री पकडले व पुढील तपास व चौकशीसाठी तुळींज पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.या गोळीबारासाठी आणि भावाच्या हत्येचा बदला घेण्यासाठी सुपारी देणाऱ्या भाजप पदाधिकारी चंद्रशेखर ऊर्फ बबुआ गुप्ता यालाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. फरार तीन आरोपींचीही नावे सिद्ध झाली असून त्यांचा शोध घेत पोलीस तपास करत आहे. जखमी राजकुमार ऊर्फ बैल गुप्ता (३२) याची तब्येत खालावली असल्याने त्याला पुढील उपचारासाठी मुंबईच्या हिंदुजा हॉस्पिटलमध्ये पाठवण्यात आले असून तुळींज पोलीस ठाण्याचे एक पोलीस अधिकारी आणि तीन कर्मचारी सुरक्षेसाठी तैनात करण्यात आल्याचे पोलीस सूत्रांकडून कळते.नालासोपाऱ्याच्या प्रगतीनगरमध्ये सुभाषचंद्र रामसागर गुप्ता (२१) याला १७ मार्च २०१६ ला दारू पाजून चार मित्रांनी गळ्यात रश्शी टाकून त्याचा गळा दाबून खून केला होता. यातील चारही आरोपींना अटक करून सुटका झाल्यानंतर राजकुमार ऊर्फ बैल गुप्ता (३२) याच्यासोबत अनेक वेळा चंद्रशेखर ऊर्फ बबुआ गुप्ता याने पाहिले होते. तेव्हा माझ्या भावाच्या हत्येत राजकुमारचा हात असल्याचा संशय त्याच्या मनात येत असल्याने आरोपी चंद्रशेखर ऊर्फ बबुआ याने चार महिन्यांपूर्वी यातील आरोपींना राजकुमार याला मारण्याची सुपारी दिली होती.

गोळीबार गुन्ह्याचा उलगडा झाला असून सुपारी देणाऱ्या आरोपीसह एकाला अटक केले आहे. तीन फरार आरोपींचा शोध घेत असून लवकरच अटक करण्यात येईल. दोन्ही आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी आहे.- राजेंद्र कांबळे, पोलीस निरीक्षक, तुळींज पोलीस ठाणे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी