शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी दोघांविरोधात गुन्हा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 21, 2019 21:01 IST

आरोपींनी वारंवार प्रत्यक्ष भेटून संगनमत करून मानसिक त्रास दिला...

पिंपरी : वारंवार प्रत्यक्ष भेटून संगनमत करून मानसिक त्रास दिला. तुझ्या बायकोचे लफडे आहे, तू कस काय लग्न केले, असे म्हणून एकाला आत्महत्येस प्रवृत्त केले.  याप्रकरणी दोघांविरोधात भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ज्ञानेश्वर दत्तू कांबळे असे फाशी घऊन आत्महत्या केलेल्या व्यक्तीचे नाव आहे. या प्रकरणी मयत ज्ञानेश्वरची आई सुरेखा दत्तू कांबळे (वय ४५, रा. आदर्शनगर, मोशी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अजय नंदकुमार घाडगे आणि बालाजी उर्फ  सोन्या अशोक येडके (दोघेही रा. देवळाई, ता. कळंब, जि. उस्मानाबाद) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी घाडगे आणि येडके हे दोघेही ज्ञानेश्वर यांच्या पत्नीच्या गावातील आहेत. दोघाही आरोपींनी संगनमत करून वारंवार प्रत्यक्ष भेटून दारू पाजून तसेच फोन करून तुझ्या बायकोचे लफडे आहे, तू कस काय लग्न केले, असे म्हणून मानसिक त्रास दिला. ज्ञानेश्वर यांनी २९ जुलै रोजी त्यांच्या घरातील लोखंडी अँगलला साडीच्या साहाय्याने फाशी घेतली. याबाबत भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात २९ जुलै रोजी आकस्मात मयत अशी नोंद करण्यात आली होती. मात्र, २० सप्टेंबर रोजी मयत ज्ञानेश्वर यांच्या आईने पोलीस ठाण्यात येऊन आरोपी अजय आणि सोन्या यांच्या विरोधात फिर्याद दिली. त्यानुसार आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस