शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
4
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
5
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
6
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
7
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
8
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
9
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
10
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
11
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
12
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
13
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
14
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
15
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
16
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
17
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
18
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
19
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
20
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
Daily Top 2Weekly Top 5

भयावह आकडेवारी! देशात दर तासाला तीन बलात्कार, दिवसाला ८० हत्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 30, 2022 16:13 IST

NCRB Data of Crime in 2021 नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. एनसीआरबी ही केंद्र सरकारचीच एजन्सी आहे. ती १९५३ पासूनची आकडेवारी प्रसिद्ध करते, तसेच पहिल्या अहवालात या संस्थेने १९४८ चे आकडे देखील दिले होते. 

देश स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा करत आहे. देशाने या ७५ वर्षांत विलक्षण प्रगती केली आहे. परंतू, गुन्हेगारीने देखील पार मुळापर्यंत हात पाय पसरले आहेत. १९४८ मध्ये स्वातंत्र्याच्या एक वर्षात पोलीस ठाण्यांमध्ये ६ लाखांच्या आसपास गुन्हे नोंद झाले होते. २०२१ मध्ये याच गुन्ह्यांची संख्या साठ लाखांवर गेली आहे.  स्वातंत्र्यानंतर देशातील गुन्हेगारी ही दहा टक्क्यांनी वाढली आहे. ही त्या त्या वर्षाची आकडेवारी आहे. 

नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्यूरोने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. एनसीआरबी ही केंद्र सरकारचीच एजन्सी आहे. ती १९५३ पासूनची आकडेवारी प्रसिद्ध करते, तसेच पहिल्या अहवालात या संस्थेने १९४८ चे आकडे देखील दिले होते. 

नुकताच NCRB ने 2021 चा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार गेल्या वर्षी देशभरात 60.96 लाख गुन्हेगारी स्वरुपाचे गुन्हे दाखल झाले. यापैकी 36.63 लाख खटले भारतीय दंड संहिता (IPC) अंतर्गत नोंदवले गेले. तथापि, 2020 च्या तुलनेत 2021 मध्ये सुमारे 8% कमी गुन्हे नोंद झाले होते. 2020 मध्ये 66 लाखांहून अधिक गुन्हे नोंद करण्यात आले होते. 2021 मध्ये देशभरात 29,272 हत्येचे गुन्हे दाखल झाले आहेत. म्हणजेच दररोज 80 मर्डर. 2020 च्या तुलनेत हा आकडा 0.3% ने जास्त आहे. 2020 मध्ये खुनाचे 29,193 गुन्हे दाखल झाले होते. बहुतांश हत्यांमागे वाद कारणीभूत असल्याचे देखील यात म्हटले आहे. गेल्या वर्षी या वादातून 9,765 खून झाले होते. त्याच वेळी वैयक्तिक वैमनस्यातून 3,782 खून झाले आहेत.

2021 मध्ये महिलांबाबतच्या 4.28 लाखांहून अधिक गुन्ह्यांची नोंद झाली आहे. तर बलात्काराचे ३१,६७७ गुन्हे दाखल झाले. दर तासाला तीन महिलांवर बलात्कार झाले आहेत. बलात्काराच्या प्रयत्नाचे ३,८०० गुन्हे दाखल झाले. बलात्काराच्या घटनांमध्ये 97% आरोपी हे ओळखीतलेच होते. 2,024 प्रकरणांमध्ये कुटुंबातील सदस्यच बलात्कार करणारा होता. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी