शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

Crime News: वाढदिवसानिमित्त तरुणीला घरी बोलावून बलात्कार केला, नंतर अश्लिल व्हिडीओ बनवून...

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2021 23:54 IST

Crime News: एका तरुणीने तिच्याच मित्रावर बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेत आरोपी तरुणाला अटक केली आहे.

जयपूर - राजस्थानमधील उदयपूर शहरातील सुखेर ठाणे क्षेत्रातील एका तरुणीने तिच्याच मित्रावर बलात्काराचा आरोप केला आहे. या प्रकरणी तरुणीने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा नोंद करून घेत आरोपी तरुणाला अटक केली आहे. सदर तरुणाने आपल्याला वाढदिवसाचे निमित्त करून घरी बोलावले. त्यानंतर बलात्कार करून अश्लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले गेले, असा आरोप सदर तरुणीने केला आहे. दरम्यान, सध्या आरोपी तरुण कोठडीत आहे. (A young woman was called home on her birthday and raped, then made a pornographic video)

पीडित तरुणीने सांगितले की, तिची विनोद नावाच्या एका तरुणासोबत ओळख होती. एप्रिल महिन्यामध्ये सदर तरुणी विनोदच्या वाढदिवसालाही केली होते. तिथे त्याने तिची ओळख कपिल नागदा नावाच्या तरुणासोबत करवून दिली. त्यानंतर कपिल हा नियमितपणे तिच्या संपर्कात होता. काही दिवसांनंतर त्याने तिला वाढदिवसाचे निमित्त सांगून पार्टीसाठी उदयपूरला बोलावले. सदर तरुणी वाढदिवसाच्या पार्टीमध्ये सहभागी होण्यासाठी उदयपूरमध्ये आली. तिथे कपिल तिला एका रेस्टॉरंटमध्ये घेऊन गेला. तरुणीचा आरोप आहे की, कपिलने तिला गुंगीचे औषध पाजले. त्यानंतर हायवेजवळील एका हॉटेलमध्ये नेऊन तिच्यावर बलात्कार केला. तसेच आरोपींनी तिचे अश्लिल व्हिडीओ आणि फोटो काढले.

सदर युवतीच्या जुन्या ओळखीमधील विनोदने कपिलच्या मोबाईलमधून हे अश्लिल फोटो आणि व्हिडीओंचे स्क्रिनशॉट घेतले. युवतीने सांगितले की, कपिल नागदा आणि विनोदमध्ये वाद झाला. त्यानंतर विनोदने तिचे अश्लिल फोटो आणि व्हिडीओ व्हायरल केले. हे फोटो आणि व्हिडीओ सदर तरुणी्च्या नातेवाईकांपर्यंत पोहोचले. त्यानंतर सदर तरुणीने सुखेर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली. त्या तक्रारीवरून पोलिसांनी कपिल नागदा याला अटक केली आहे. तसेच विनोदचा शोध सुरू आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीRajasthanराजस्थान