शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
Kolkata hotel Fire: कोलकातामधील हॉटेलमध्ये लागली भयंकर आग, १४ जणांचा होरपळून मृत्यू
5
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
6
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
7
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
8
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
9
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
10
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
11
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
12
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
13
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
14
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
15
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
16
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
17
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
18
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
19
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
20
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?

Crime News: घरी अन् कार्यालयात जवळच्याच लोकांपासून महिला असुरक्षित, बलात्काराच्या ९६ टक्के प्रकरणांत ओळखीच्या लोकांवर आरोप

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2022 10:07 IST

Crime News: बलात्काराच्या ९६ टक्के प्रकरणांत कुटुंबातील सदस्य, मित्र आणि लिव्हिंग पार्टनरसह अन्य परिचित लोक असल्याचे दिसून आले आहे. बलात्काराच्या प्रकरणांत जी तीन राज्ये पहिल्या तीन क्रमांकावर आहेत, त्यात राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक आहे.

नवी दिल्ली - बलात्काराच्या ९६ टक्के प्रकरणांत कुटुंबातील सदस्य, मित्र आणि लिव्हिंग पार्टनरसह अन्य परिचित लोक असल्याचे दिसून आले आहे. बलात्काराच्या प्रकरणांत जी तीन राज्ये पहिल्या तीन क्रमांकावर आहेत, त्यात राजस्थान, मध्य प्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक आहे.पॉक्सो प्रकरणात राजस्थान, आंध्र प्रदेश आणि झारखंड ही तीन राज्ये आघाडीवर आहेत. या आकडेवारीनुसार, राजस्थानात २०२१ मध्ये बलात्काराची ६३३७ प्रकरणे दाखल झाली. यातील ६०७४ आरोपी हे परिचित होते. राष्ट्रीय गुन्हे रेकॉर्ड ब्यूरोनुसार, ५८२ प्रकरणांत कुटुंबातीलच सदस्य, १७०१ प्रकरणात मित्र, ऑनलाइन मित्र अथवा लिव्हिंग पार्टनर, तर ३७९१ प्रकरणांत आरोपी हे कुटुंबातील मित्र, शेजारी किंवा नोकरीस ठेवणारा मालक आहे. २६३ प्रकरणांत बलात्कार करणाऱ्या आरोपींची ओळख पटली नाही. 

दिल्लीतील महिला सर्वाधिक असुरक्षितदिल्ली हे महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार, २०२१ मध्ये दिल्लीत महिलांवरील अत्याचाराच्या १३,९८२ गुन्ह्यांची नोंद झाली आहे, तर देशातील एकूण १९ महानगरांमध्ये महिला अत्याचाराच्या ४३ हजार गुन्ह्यांची नोंद झाली आहे. दिल्लीनंतर मुंबईत सर्वाधिक गुन्हे दाखल झाले आहेत. बंगळुरू तिसऱ्या क्रमांकावर आहे.

पॉक्सोमध्ये टॉप तीन राज्ये (* वय वर्षांमध्ये) राज्य     ० ते ६     ६ ते १२     १२ ते १६     १६ ते १८    एकूण १. राजस्थान     १८     ६४     ४४२     ९२९     १४५३ २. आंध्र प्रदेश     १७     ५०     २५९     २८८     ६१४ ३. झारखंड     ००     ०२     ६२     २३१     २९५ 

बलात्कारात टॉप तीन राज्ये (* वय वर्षांमध्ये) राज्य     १८ ते ३०     ३० ते ४५     ४५ ते ६०     ६०+     एकूण राजस्थान     ३२६५     १३०५    ३१५     ४     ४८८९ मध्य प्रदेश     १९४७     ८४६     १३९     १५     २९४७ महाराष्ट्र     १६०५     ७९५     ६९     ९     २४७८

बलात्काराच्या ९६ टक्के प्रकरणांत ओळखीच्या लोकांवर आरोप

दररोज दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कारअहवालानुसार, २०२१ मध्ये दिल्लीत दररोज दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार झाला. अहवालानुसार, दिल्लीत बलात्कार, अपहरण आणि महिलांवरील क्रूरतेच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. २०२१ मध्ये दिल्लीत अपहरणाचे ३,९४८, पतीकडून अत्याचाराचे ४,६७४ आणि मुलींवर बलात्काराचे ८३३ गुन्हे दाखल झाले. २०२१ मध्ये दिल्लीत हुंडाबळी मृत्यूची १३६ प्रकरणे नोंदवली गेली, जी १९ महानगरांमधील एकूण मृत्यूच्या ३६.२६ टक्के असल्याचे अहवालात सांगण्यात आले आहे. देशात सायबर गुन्ह्यात तेलंगणा प्रथम क्रमांकावर आहे. या राज्यात १०३०३ प्रकरणे दाखल झाली आहेत. दुसऱ्या क्रमांकावर आहे उत्तर प्रदेश. या राज्यात ८८२९ प्रकरणे दाखल झाली आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी