शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमासाठी काय पण! नवरा आणि मुलाला सोडून बॉयफ्रेंडसाठी महिला झाली चक्क 'लेडी डॉन' अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2022 18:09 IST

Crime News : एका महिलेने आपल्या प्रियकरासाठी पतीला आणि पोटच्या मुलाला सोडलं. धक्कादायक बाब म्हणजे ती बॉयफ्रेंडच्या प्रेमात इतकी वेडी झाली की बॉयफ्रेंडसाठी तिने गुंडगिरी करण्यास सुरुवात केली.

नवी दिल्ली - प्रेमात आणि युद्धात सर्वकाही माफ असतं असं म्हटलं जातं. काही जण प्रेमासाठी वाटेल ते करतात. अशीच एक अजब घटना समोर आली आहे. एका महिलेने आपल्या प्रियकरासाठी पतीला आणि पोटच्या मुलाला सोडलं. धक्कादायक बाब म्हणजे ती बॉयफ्रेंडच्या प्रेमात इतकी वेडी झाली की बॉयफ्रेंडसाठी तिने गुंडगिरी करण्यास सुरुवात केली. लेडी डॉन झाली. अखेर पोलिसांनी सापळा रचून या लेडी डॉनला ताब्यात घेतलं. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. नगमा असं या आरोपी महिलेचं नाव आहे. 

नगमा ही पटनामधील एका मध्यमवर्गीय कुटुंबातील स्त्री आहे. लग्नानंतर ती राहुल नावाच्या एका व्यक्तीच्या प्रेमात पडली. राहुल हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा व्यक्ती होता. चोरी, लुटमार आणि तस्करी प्रकरणी तो अनेकदा तुरुंगात देखील गेला आहे. नगमा राहुलसाठी तस्करी आणि चोरी करायची. दरम्यान या दोघांनी अनिशाबाद येथील एक मोबाईलचं दुकान लुटण्याचा प्रयत्न केला. दुकानदाराला घाबरवण्यासाठी त्यांनी गोळीबार देखील केला होता. 

चोरीची चौकशी करत असताना पोलीस नगमापर्यंत येऊन पोहोचले. मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी CCTV फुटेजच्या मदतीने नगमाला शोधून काढलं. त्यावेळी चौकशीदरम्यान खरा प्रकार समोर आला. नगमाचे राहुलसोबत गेल्या अनेक वर्षांपासून संबंध आहेत. राहुलसाठी तिने आपल्या नवऱ्याला आणि मुलाला देखील सोडून दिलं होतं. परंतु 2015 तो एका हत्येच्या प्रकरणात तुरुंगात गेला होता. 

काही महिन्यांपूर्वी तो तुरुंगातून सुटून आला. परंतु बाहेर येताच त्यांनी पुन्हा एकदा लुटमार करण्याचा प्रयत्न केला अन् ते अखेर पकडले गेले. राहुल तुरुंगात असताना त्याच्यावतीने नगमा त्याची टोळी चालवत होती. त्यामुळे अनेक धक्कादायक प्रकरणात तिचा देखील समावेश होता. पण आता तिला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस