शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: वायर चोरण्यासाठी आला आणि जीव गमावून बसला, इमारतीच्या आठव्या मजल्यावरून पडून चोराचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2022 19:30 IST

Crime News: डोंबिवली येथील पुर्वेकडील खंबाळपाडा परिसरातील केडीएमसीच्या बीएसयूपी प्रकल्पाच्या इमारतीत वायर चोरण्यासाठी आलेल्या दोघा चोरटयांपैकी एक चोरटयाचा पळताना आठव्या मजल्यावरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली.

डोंबिवली -  येथील पुर्वेकडील खंबाळपाडा परिसरातील केडीएमसीच्या बीएसयूपी प्रकल्पाच्या इमारतीत वायर चोरण्यासाठी आलेल्या दोघा चोरटयांपैकी एक चोरटयाचा पळताना आठव्या मजल्यावरून खाली पडल्याने मृत्यू झाल्याची घटना सोमवारी मध्यरात्री घडली. मोहम्मद सलिम भाटकर (वय 24) असे मृत चोरटयाचे नाव असून तो चोरीच्या गुन्हयात सराईत होता. त्याचा सहकारी अरफान पिंजारी हा जखमी झाला असून त्याच्यावर मनपाच्या शास्त्रीनगर रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेची नोंद टिळकनगर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.

केडीएमसीच्या वतीने बीएसयुपी योजनेंतर्गत शहरी गरिबांसाठी घरकुले उभारण्यात आली आहेत. परंतू बहुतांश ठिकाणी घरकुलांचा ताबा लाभार्थ्यांना न मिळाल्याने खंबाळपाडा, इंदिरानगर भागातील इमारती सध्या भग्नावस्थेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून या इमारतींना चोरटयांनी लक्ष केले आहे.

दरवाजे, ग्रील, लिफ्टचे सामान चोरीला गेल्याच्या घटना आधी घडल्या आहेत. दरम्यान खंबाळपाडा इमारतीमधील बिल्डिंग नंबर चारच्या आठव्या मजल्यावर इलेक्ट्रिक वायर चोरी करण्यासाठी अरफान आणि मोहम्मद हे दोघे चोरटे सोमवारी मध्यरात्री आले होते. इमारतीमध्ये चोर शिरल्याचे वॉचमनच्या लक्षात येताच तो त्यांच्या पाठिमागे गेला. वॉचमनमुळे आपण पकडले जावू या भितीने दोघांनी इमारतीच्या ड्रेनेज पाईपलाईनवरून खाली उतरण्याचा प्रयत्न केला. यात हात निसटल्याने मोहम्मद आणि अरफान आठव्या मजल्यावरून खाली कोसळले. यात मोहम्मदच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर अरफान गंभीर जखमी झाला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीdombivaliडोंबिवली