शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पत्नी पगार काढून घ्यायची, रोज मारहाणही करायची, त्रस्त पतीनं उचललं टोकाचं पाऊल, केली आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये मांडली व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2022 17:20 IST

Crime News: एका पतीने पत्नीच्या छळाला वैतागून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पतीने गळफास लावून आपले जीवन संपवले असून, आपली सर्व करुण कहाणी त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिली आहे. त्याआधारावर मृताची पत्नी आणि मेहुण्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोपाळ - पत्नी, सुनेचा छळ झाल्याच्या अनेक घटना रोज समोर येत असतात. मात्र मध्य प्रदेशमधील धार येथे एका पतीने पत्नीच्या छळाला वैतागून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. पतीने गळफास लावून आपले जीवन संपवले असून, आपली सर्व करुण कहाणी त्याने सुसाईड नोटमध्ये लिहिली आहे. त्याआधारावर मृताची पत्नी आणि मेहुण्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणातील पतीला त्याच्या पतीने एवढे छळले की, त्याने अखेर गळफास लावून आपल्या जीवनाच शेवट केला. धारमधील वेअरहाऊसमधील कर्मचारी असलेल्या दीपक वसुनिया यांची ही करुण कहाणी आहे. दीपकने आपल्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. याबाबतची माहिती मिळाल्यावर पोलिसांनी घटनास्थळावर पोहोचून मृतदेह ताब्यात घेतला. तसेच शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला. घटनास्थळावर सापडलेल्या सुसाईड नोटमध्ये पत्नी टीना हिच्या छळाला कंटाळून आत्महत्या केल्याचे पीडित पतीने नमूद केले आहे.

दरम्यान, त्या आधारावर पोलिसांनी मृत व्यक्तीची पत्नी टीना आणि तिच्या दोन भावांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. त्यामधून या संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. तसेच दीपक याची पत्नी भावांसोबच मिळून त्याला मारहाम करायची, त्याच्याकडील पगार काढून घ्यायची, असे मृत दीपकच्या भावाने सांगितले. तसेच या लोकांनी दीपकविरोधात पोलिसांत गुन्हाही दाखल केला होता. त्यामुळे दीपक त्रस्त होता. टीना त्याच्याकडील सगळा पगार काढून घेऊन माहेरी पाठवायची. तसेच त्याने नकार दिल्यावर भावांना बोलावून त्याला मारहाण करायची, अशीही माहिती समोर आली आहे.

संपूर्ण प्रकरणात शहर पोलिसांनी आरोपी पत्नी टीना आणि तिच्या माहेरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तसेच पुढील कारवाई सुरू आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार