शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पत्नीने भाचा आणि भाओजींच्या मदतीने केली पतीची हत्या, समोर आली थरकाप उडवणारी कहाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2022 17:46 IST

Crime News: मध्य प्रदेशमधीली रीवा पोलिसांनी गुलामुद्दीन उर्फ मंजू हत्याकांडाचा उलगडा केला आहे. या व्यक्तीची हत्या त्याची पत्नी, तिचा भाओजी आणि भाच्याने केली होती.

भोपाळ - मध्य प्रदेशमधीली रीवा पोलिसांनी गुलामुद्दीन उर्फ मंजू हत्याकांडाचा उलगडा केला आहे. या व्यक्तीची हत्या त्याची पत्नी, तिचा भाओजी आणि भाच्याने केली होती. मृत व्यक्ती पहिल्या पत्नीला संपत्तीमध्ये वाटा देत नव्हता.  त्यामुळेच त्याची हत्या करण्यात आली. मृत व्यक्तीने दुसरे लग्न केले होते. त्यानंतर काम करण्यासाठी तो जम्मू काश्मीरमध्ये गेला होता. तो गावात परतल्यावर त्याला वाटेतून हटवण्यासाठी आरोपींनी त्याची हत्या केली. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे. आरोपींना गुन्हा कबूल केला असून, आरोपींनी हत्या केल्यानंतर मृतदेह विद्रुप केला होता.

मिळालेल्या माहितीनुसार २३ मे रोजी काही लोक नईगडी पोलीस ठाण्याच्या अंतर्गत येणाऱ्या सिगदहा पुलावरून जात होते. तेव्हा त्यांना पाण्यामध्ये एक मृतदेह दिसला. त्यांनी आरडाओरडा करून गाववाल्यांना जमा केले आणि पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना घटनास्थळी धाव घेत मृतदेहाची तपासणी केली. या मृतदेहाच्या शरीराचे अनेक भाग कापलेले होते. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पोस्टमार्टेमसाठी पाठवला.

पोलिसांनी संपूर्ण परिसरात चौकशी केली. तसेच आजूबाजूच्या लोकांकडेही विचारणा केली. दरम्यान, कुणीतरी हा मृतदेह ओळखला. त्याने पोलिसांना मृताचं नाव गुलामुद्दीन उर्फ मंजू असल्याचे सांगितले. पोलिसांनी सांगितले की मृताची ओळख मोज्यावरून पटली. नातेवाईकांनी त्याचे मोजे ओळखले. त्यानंतर पोलिसांनी तपास अधिक वेगवान केला. दरम्यान, पोलिसांना मृताच्या पहिल्या पत्नीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर हळूहळू संपूर्ण हत्याकांडाचा उलगडा झाला.

या हत्याकांडाबाबत रीवा जिल्ह्याचे एसपी नवनीत भसीन यांनी सांगितले की, नईगडी पोलीस ठाण्याच्या क्षेत्रांतर्गत पुलावर मिळालेल्या मृत व्यक्तीची हत्या ही अन्य कुणी नाही तर त्याची पत्नी आणि तिचा भाचा आणि भाओजींनी केली होती. पोलिसांनी सांगितले की, मृत व्यक्ती आणि त्याची पत्नी १२ वर्षांपासून वेगळे राहत होते. तसेच पती तिला संपत्तीमध्ये वाटा देत नव्हता. त्यामुळे पत्नीने भाचा आणि भाओजीसोबत मिळून त्याची हत्या केली. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवारMadhya Pradeshमध्य प्रदेश