शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

नात्याला काळीमा! ...म्हणून 'तिने' नवऱ्याचाच काढला काटा; मुलगा आणि दिरानेही दिली साथ

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2021 19:58 IST

Crime News : पतीची हत्या केली आणि पतीचा मृतदेह हा शेतात जाळून टाकत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना या सातत्याने समोर येत आहेत. याच दरम्यान आता नात्याला काळीमा फासणारी एक घटना घडली आहे. जमीन विकण्याच्या वादातून पत्नीने आपल्या पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीला आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे महिलेला तिचा मुलगा आणि दीर यांनी देखील साथ दिली आहे. या तिघांनी मिळून पतीची हत्या केली आणि पतीचा मृतदेह हा शेतात जाळून टाकत पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानमधील करौली भागात एका व्यक्तीकडे वडिलोपार्जित जमीन होती. त्याची पत्नी शीतलबाई, भाऊ गोविंद आणि मुलगा जितेंद्र यांच्यासोबत त्याचे सतत वाद होत असत. गेल्या काही वर्षात कर्जबाजारी झालेल्या व्यक्तीकडे उत्पन्नाचं काहीही साधन नव्हतं. शेतीतून मिळणारं उत्पन्न हे कर्ज फेडण्यासाठी पुरेसं नसल्यामुळे ती जमीन विकून कर्ज फेडण्याचा विचार तो करत होता. मात्र त्याच्या पत्नी आणि मुलाला ही बाब मान्य नव्हती. भाऊ गोविंदचाही ही जमीन विकायला विरोध होता.

रागाच्या भरात पतीला बेदम मारहाण

जमिनीवरून पती-पत्नीत सतत टोकाचा वाद होत असे. याच वादाचं रुपांतर पुढे मारहाणी झालं. पत्नीने रागाच्या भरात पतीला बेदम मारहाण केली. तिच्यासोबत मुलाने आणि भावानेदेखील त्याच्यावर वार केले. लाठाकाठ्यांनी मारून त्याला जखमी करण्यात आले. यामध्येच पतीचा मृत्यू झाला. पतीच्या मृत्यूनंतर पत्नी आणि इतरांनी त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय़ घेतला. 

पोलिसांनी तिघांनाही केली अटक

घरासमोर असणाऱ्या शेतात पतीचा मृतदेह जाळण्यात आला. मात्र पतीच्या एका नातेवाईकाने त्याची हत्या झाल्याची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी आपला गुन्हा कबूल केला. पोलिसांनी या तिघांनाही अटक केली असून त्यांच्यावर हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस