शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

माणुसकीला काळीमा! तरुणाला झाडाला उलटं लटकवलं अन् बेदम मारलं; भयंकर Video व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2022 13:05 IST

Crime News : एका तरुणाला झाडाला उलटं लटकवून बेदम मारहाण करण्यात आली आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

नवी दिल्ली - माणुसकीला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. छत्तीसगडमधील बिलासपूर जिल्ह्यात एका तरुणाला झाडाला उलटं लटकवून बेदम मारहाण करण्यात आली आहे. याचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये एका तरुणाला झाडाला उलटं लटकवून काही तरुण मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. तरुण त्यांची माफी मागून मला मारू नका अशी विनंती करत होता. चोरीच्या संशयातून ही मारहाण करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह पाच जणांना अटक केली आहे.

पोलीस अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बिलासपूरच्या सिपत पोलीस स्टेशन हद्दीतील उचाभट्टी गावात तरुणाला मारहाण करण्यात आली आहे. यानंतर पोलिसांनी 15 वर्षीय मुलासह पाच जणांना अटक केली आहे. मनीष खरे, शिवराज खरे आणि जानू भार्गव यांना शुक्रवारी सायंकाळी उशिरा अटक करण्यात आली. या घटनेतील पीडित महावीर हा सूर्यवंशी जिल्ह्यातील रतनपूर भागातील रहिवासी आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. 

सिपत परिसरातील उचभट्टी गावात राहून तो मजूर आणि चौकीदार म्हणून काम करतो. असं समोर आलं आहे की 24-25 एप्रिलच्या मध्यरात्री मनीषने महावीरला घरात घुसण्याचा प्रयत्न करताना पाहिलं होतं. यावेळी महावीर पळून जाण्यात यशस्वी झाला, मात्र दुसऱ्या दिवशी सोमवारी मनीषने त्याला पकडलं आणि त्याच्यावर चोरीचा प्रयत्न केल्याचा आरोप करत पोलिसांच्या हवाली केलं. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, मनीषने महावीरविरुद्ध पोलिसांत गुन्हा नोंदवला नाही, त्यामुळे पोलिसांनी महावीरला इशारा देऊन सोडून दिलं.

पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितलं की, नंतर मनीषने महावीरवर आरोप केला की बुधवारी रात्री महावीर पुन्हा त्याच्या घरी पोहोचला आणि बाहेर पार्क केलेल्या त्याच्या मोटरसायकलचं नुकसान करून पळून गेला. गुरुवारी, मनीष आणि इतर चार आरोपींनी महावीरला पकडलं आणि त्याला गावातील वीटभट्टीजवळील झाडाला उलटं टांगलं आणि मारहाण केली. त्यानंतर त्यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल केला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी