शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
4
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
5
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
6
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
7
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
8
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
9
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
10
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
11
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
12
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
13
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
14
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
15
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
16
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
17
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
18
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
19
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
20
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! संपत्तीसाठी मुलाने उचललं टोकाचं पाऊल; जन्मदात्या आईची केली हत्या, वडील जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 28, 2022 08:49 IST

Crime News : पैशाच्या हव्यासापोटी लेकाने आईवडिलांवरच गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला. तर वडील गंभीररित्या जखमी झाले आहेत.

नवी दिल्ली - देशात अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. अशीच एक नात्याला काळीमा फासणारी घटना आता समोर आली आहे. संपत्तीसाठी मुलाने टोकाचं पाऊल उचललं आहे. पैशाच्या हव्यासापोटी लेकाने आईवडिलांवरच गोळ्या झाडल्या आहेत. यामध्ये आईचा जागीच मृत्यू झाला. तर वडील गंभीररित्या जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशच्या खुर्जा जंक्शन चौकी परिसरात ही संतापजनक घटना घडली आहे. पोलिसांनी याबाबत माहिती दिली असून याचा अधिक तपास केला जात आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेच्या मुलाने गोळाबार केल्याने त्याला ताब्यात घेण्यात आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, मंजू देवी असं या 55 वर्षीय महिलेचं नाव असून त्या विमला नगर कॉलनीत राहत होत्या. मंजू देवी यांचे पती ओमप्रकाश यांना डोक्याच्या मागच्या बाजुला गोळी लागली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वरिष्ठ पोलीस अधीक्षक संतोष कुमार सिंह यांनी दिलेल्या माहितीनुसार ओमप्रकाश यांच्यावर मेरठमधील एका रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलीस या प्रकरणी अनेकांची चौकशी करत असून नेमकं काय घडलं याचा तपास करत आहेत. 

पैशाच्या हव्यासापोटी लेकाने आईवडिलांवरच झाडल्या गोळ्या

ओमप्रकाश यांनी आपली जमीन 12.5 लाखांना विकली होती. या पैशाने त्याने दुसऱ्य़ा ठिकाणी जमिनीचा एक तुकडा विकत घेतला. ओमप्रकाश हे पैसे आपली दोन मुलं आणि सुना यांच्यापैकी फक्त एकावरच खर्च करत होते. त्यामुळे त्याचा दुसरा मुलगा यतेंद्र हा खूप नाराज असल्याची माहिती शेजाऱ्यांनी दिली. यतेंद्र आपल्या वृद्ध आईवडिलांशी यावरून नेहमीच वाद घालत असे. रोज त्यांच्यामध्ये भांडणं होत असल्याचं देखील गावकऱ्यांनी पोलिसांना सांगितलं आहे. त्यामुळे संपत्तीतून त्याने गोळ्या झाडल्याचं आता समोर आलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीUttar Pradeshउत्तर प्रदेश