शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: 'ही तरुणी माझ्या भाईचं प्रेम, तिच्याशी लग्न केलंस तर...', गँगस्टरने तरुणाला दिली धमकी, त्यानंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 23, 2022 16:01 IST

Crime News: लग्न ठरलेल्या एका तरुणाला गँगस्टरने धमकी दिली की, तो ज्या तरुणीशी लग्न करणार आहे तिच्यावर त्याच्या भावाचं प्रेम आहे. या गँगस्टर्सनी त्या तरुणाला लग्न न करण्यासाठी धमकी दिली.

गुरुग्राम - हरियाणामध्ये अनेक गँगस्टर्सनी उच्छाद मांडला आहे. कुठलाही मोठा गुन्हा करण्यास ते मागेपुढे पाहत नसल्याने सर्वसामान्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. असाच एक धक्कादायक प्रकार गुरुग्राममधील फारुखनगर येथून समोर आला आहे. येथे लग्न ठरलेल्या एका तरुणाला गँगस्टरने धमकी दिली की, तो ज्या तरुणीशी लग्न करणार आहे तिच्यावर त्याच्या भावाचं प्रेम आहे. या गँगस्टर्सनी त्या तरुणाला लग्न न करण्यासाठी धमकी दिली. त्यानंतर या गुंडांकडून फोनवर वारंवार धमक्या येत होत्या. अखेरीस या तरुणाचा विवाह पोलीसांच्या बंदोबस्ताखाली करण्यात आला.

धमकी मिळालेल्या तरुणाने सांगितलं की, त्याचा विवाह बंधवाडी येथे राहणाऱ्या तरुणीशी  झाला. मात्र या विवाहापूर्वी त्याला एक कॉल आला. त्यात सांगण्यात आले की, ही तरुणी माझ्या भाईचं प्रेम आहे. जर तिच्याशी विवाह केला तर खूप वाईट परिणाम होतील. फोन करणाऱ्याने आपण कुख्यात गँगस्टरचा गुंड असल्याचे सांगितले. त्याच्या धमक्यांना घाबरलेल्या तरुणाने पोलिसांना याबाबत सांगितले. त्यानंतर पोलीस संरक्षणात त्याचा विवाह पार पडला.

याबाबत पोलीस अधिकारी प्रीतपाल सिंह यांनी सांगितले की, एका तरुणाने त्याला गुंडांकडून सातत्याने धमक्या येत असल्याची तक्रार दिली. त्यानंतर आम्ही पोलीस संरक्षणात त्याचं लग्न लावून दिलं. लग्नावेळी कुठलीही समस्या आली नाही. आता पोलीस ही धमकी खरंच कुण्या गुंडानं दिली होती की, कुठल्या तरुणाने खोडसाळपणा केला, याचा तपास करत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीmarriageलग्नHaryanaहरयाणा