शहरं
Join us  
Trending Stories
1
विजय रुपाणींचा विमानात बसलेला फोटो समोर आला; पंतप्रधान नरेंद्र मोदी अहमदाबादकडे रवाना 
2
Air India Plane Crash: अहमदाबाद विमान दुर्घटनेत २० मेडिकल विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची भीती
3
Ahmedabad Plane Crash: अपघातग्रस्त विमानातील क्रू मेंबर्सची यादी आली समोर; दोन मराठी नावांचा समावेश
4
अहमदाबाद विमान अपघात : मृतांच्या कुटुंबियांना किती पैसे मिळतील? जाणून घ्या कायदा काय सांगतो!
5
Plane Crash Incident: पायलटकडे केवळ एका मिनिटाचाच वेळ होता, पण..., एअर इंडियाच्या विमान अपघाताचे कारण समोर आले
6
Air India Plane Crash: विमानातून प्रवास करणारे कोण? भारतीय आणि परदेशी नागरिक किती होते?
7
मेडिकल कॉलेजचे डॉक्टर मेसमध्ये जेवण करत होते, तेवढ्यात...; २० इंटर्न डॉक्टरांच्या मृत्यूची भीती व्यक्त
8
जोरदार आवाज, सगळीकडे धूर अन् समोर मृतदेहांचा खच; प्रत्यक्षदर्शींनी विमान अपघातावेळी काय पाहिलं?
9
Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनेमुळे सलमान खानने घेतला मोठा निर्णय, म्हणाला-
10
Ahmedabad Plane Crash: ११ वर्षे जुने बोईंग विमान, ७००० किमी प्रवास करणार होते; अपघातग्रस्त विमानाबद्दल सर्व काही जाणून घ्या
11
सेन्सेक्स-निफ्टी आपटले! टाटा ग्रुपला सर्वात मोठा धक्का; 'या' कारणांमुळे बाजार गडगडला
12
Ahmedabad Plane Crash Live Updates: "हे दुःख शब्दांत सांगता येणार नाही", एअर इंडिया विमान अपघातावर मोदींची प्रतिक्रिया
13
पुढे की मागे...? कुठे असतो विमानाचा इंधन टँक? क्रॅश झाल्यास या ठिकाणी बसलेल्या लोकांना पोहोचू शकतो सर्वाधिक धोका
14
मोठी अपडेट! एअर इंडियाचे विमान डॉक्टरांच्या हॉस्टेलवर कोसळले; पूर्ण इमारत जळून खाक
15
Ahmedabad Plane Crash: गुजरातमध्ये भीषण विमान अपघात! एअर इंडियाचं लंडनला जाणारं फ्लाईट कोसळलं, २४२ प्रवासी असल्याची माहिती
16
एअर इंडियाचं विमान कोसळलं! लंडनच्या प्रवासाचं तिकीट किती होतं? आकडा वाचून धक्का बसेल
17
अहमदाबाद विमान अपघात: प्रवाशांची यादी आली, गुजरातचे माजी CM विजय रुपाणी यांचेही नाव
18
Sonam Raghuvanshi : "मी थकले आहे, राजाला मार, नाहीतर मी मरेन..."; बॉयफ्रेंड राजनेच केली सोनमची पोलखोल
19
Aeroplane Black Box : विमान अपघातानंतर सर्वात आधी शोधला जातो 'ब्लॅक बॉक्स'; नेमकं काय असतं याचं काम?
20
Plane Crash: टेकऑफनंतर अवघ्या २ मिनिटांनी Air India चं विमान क्रॅश; नेमका कसा झाला अपघात?

Crime News : कारागृहातून पलायन केलेला सराईत चोरटा गजाआड

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2021 20:53 IST

Crime News : भिवंडी येथे राहणाऱ्या अविनाशने कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर एका व्यक्तीच्या खिशातून मोबाईल चोरल्याची घटना घडली होती.

कल्याणः  येथील आधारवाडी आणि पंढरपूर कारागृहातून पलायन केलेल्या आणि जबरी चोरीच्या गुन्हयातील अविनाश कैलास गायकवाड या अट्टल चोरटयाला  महात्मा फुले चौक पोलिसांनी बुधवारी सापळा लावून रात्री अकरा वाजता कल्याण बस स्थानक परिसरातून अटक केली. 

भिवंडी येथे राहणाऱ्या अविनाशने कल्याण रेल्वे स्थानकाबाहेर एका व्यक्तीच्या खिशातून मोबाईल चोरल्याची घटना घडली होती. त्या प्रकरणी महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल होता. दरम्यान आरोपी हा  कल्याण  बस स्थानक  परिसरात येणार असल्याची माहिती पोलिसांना खब-यामार्फत मिळाली. त्यानुसार त्याला अटक करण्यासाठी सापळा रचला होता. अटक केल्यानंतर त्याची अंगझडती  घेतली असता त्याच्याकडून 5 मोबाइल जप्त केले. विशेष म्हणजे त्याच्यावर  पैठण, परळी,  वैजनाथ आणि पंढरपूर सह कल्याण परिमंडळातील महात्मा फुले चौक, खडकपाडा आणि रेल्वे पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल असून कल्याणातील आधारवाडी कारागृहासह  पंढरपूर कारागृहातून देखील तो  पळून गेला होता अशी  माहिती महात्मा फुले चौक पोलिसांनी दिली.

टॅग्स :jailतुरुंगArrestअटकPoliceपोलिसkalyanकल्याण