शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
4
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
5
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
6
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
7
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
8
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
9
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
10
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
11
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
12
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
13
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
14
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
15
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
16
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
17
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
18
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
19
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
20
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."

Crime News: चाेर आले, ५०० टनांचा लोखंडी पूल घेऊन गेले! सिंचन विभागाचे कर्मचारी बनूून गॅस कटरने केले तुकडे, तीन दिवसांनी प्रकार उघडकीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 07:20 IST

Crime News: चोर आणि त्यांनी लंपास केलेले मौल्यवान साहित्य याच्या रंजक कथा आपण सतत ऐकत-वाचत असतो. बिहारच्या  रोहतस जिल्ह्यात मात्र भरदिवसा झालेली एक अजब चोरी तब्बल तीन दिवसांनी उघडकीला आली आहे.

सासाराम (रोहतस) : चोर आणि त्यांनी लंपास केलेले मौल्यवान साहित्य याच्या रंजक कथा आपण सतत ऐकत-वाचत असतो. बिहारच्या रोहतस जिल्ह्यात मात्र भरदिवसा झालेली एक अजब चोरी तब्बल तीन दिवसांनी उघडकीला आली आहे. सिंचन विभागाचे कर्मचारी बनून आलेल्या चोरांनी चक्क एका कालव्यावर बांधलेला एक लोखंडी पूलच लांबवला आहे. जेसीबीने पूल तोडल्यानंतर गॅस कटरच्या सहाय्याने त्याचे तुकडे करून चोर ट्रकमधून घेऊन पसार झाले आहेत. तीन दिवस सिंचन विभागाला या प्रकाराची सूतराम कल्पनाही नव्हती.  (वृत्तसंस्था) ...चोरांनी नेमका डाव साधलासिंचन विभागाच्या विक्रमगंज सब डिव्हिजनचे सहायक अभियंता राधेश्याम सिंह म्हणाले की, येथील गावकऱ्यांनी पूल हटवण्याची मागणी केली होती. त्यासाठी रितसर निवेदनही वरिष्ठांकडे दिले होते. परंतु त्याबाबत पुढे काहीही आदेश मिळाले नव्हते. चोरांनी नेमके हे हेरले आणि आपला डाव साधला.

गावकऱ्यांनी हटकले, पण... n रोहतसमधील सासाराम परिसरात एका कालव्यावर ४७ वर्षांपूर्वी हा पूल बांधला होता. १०० फूट लांब आणि १० रुंद पुलासाठी ५०० टन लोखंडाचा वापर केला होता. तोडणे सुरू असताना गावकऱ्यांनी चोरांना हटकलेही. n तेव्हा आम्ही सिंचन विभागाकडून आलो आहोत, असे चोरांनी सांगितले. पूल काही अंशी नादुरुस्त झाल्याने सध्या त्याचा वापर होत नव्हता. n खरा प्रकार लक्षात आल्यानंतर सिंचन विभागाच्या कनिष्ठ अभियंत्याने अज्ञात चोरांवर गुन्हा दाखल केला आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीBiharबिहार