इस्लामपूर : वाघवाडी फाटा-इस्लामपूर रस्त्यावर नव्याने सुरु असलेल्या सिमेंट रस्त्यांवर झोपलेल्या हर्षवर्धन नागनाथ पाथरवट ( वय १३) या शाळकरी मुलाचा मृतदेह सापडल्याने एकच खळबळ उडाली आहे. हर्षवर्धनची डोक्याची कवटी फुटली आहे. तर त्याच्या बाजुला झोपलेले दोघेही सुरक्षित आहेत. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.
घातपात की अपघात याबाबत उलटसुलट चर्चा सुरू आहे. अर्धी कवटी गायब असल्याने नेमका काय प्रकार आहे, हे अद्याप समजलेले नाही. पोलिसांनी याबाबत तपास सुरु केला आहे. पोलीस निरीक्षक शशिकांत चव्हाण पथकासह घटनास्थळी दाखल झाले आहेत.
याबाबत मिळालेली माहिती अशी, वाघवाडी ते इस्लामपूर रस्त्यावर अभियंता नगरमध्ये कृषी महाविद्यालयाच्या कुंपणाचे काम सुरू आहे. तेथे भिंतीलगत पाथरवट समाजाचे नागरिक गेली अनेक वर्षे दगड घडवण्याचे काम करत असतात. या दगड काम करणाऱ्यांमधील तिघेजण रात्री रस्त्यावर झोपले होते. त्यापैकी एकाचा झोपलेल्या स्थितीमध्ये आज सकाळी मृतदेह मिळल्याने एकच खळबळ उडाली आहे. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसर पिंजून काढत आहेत.