शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
3
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
4
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
5
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
6
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
7
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
8
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
9
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
10
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
11
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
12
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
13
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
14
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
15
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
16
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
17
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
18
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
19
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
20
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! क्षुल्लक वाद टोकाला गेला अन् मुलाने कानशिलात लगावल्याने वडिलांचा मृत्यू झाला 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 5, 2021 10:46 IST

Crime News : रागाच्या भरात मुलाने जन्मदात्या वडिलांच्या कानशिलात लगावल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

नवी दिल्ली - घरामध्ये विविध कारणांमुळे नेहमीच वाद होत असतात. अनेकदा हे वाद टोकाला जातात आणि त्याचं रुपांतर हे पुढे हाणामारीत होतं. अशीच एक मन सुन्न करणारी घटना आता समोर आली आहे. एक क्षुल्लक वाद टोकाला गेला आणि भांडण झाल्यामुळे रागाच्या भरात मुलाने जन्मदात्या वडिलांच्या कानशिलात लगावल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. घरगुती कारणावरून सुरू झालेला वाद विकोपाला गेल्यानंतर वडील आणि मुलगा यांच्यात हाणामारीला सुरुवात झाली. ते दोघंही एकमेकांना मारू लागले होते. या मारामारीत मुलाने मारलेल्या कानाखालीमुळे वडिलांचा जागीच मृत्यू झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या डुंगरपूर भागात ही भयंकर घटना घडली आहे.  60 वर्षांच्या पूंजा कटारा यांचे त्यांचा मुलगा प्रकाश कटारा याच्यासोबत सतत वाद होत असत. छोट्या मोठ्या कारणावरून झालेले हे वाद विकोपाला गेल्यावर दोघांमध्ये अधूनमधून हाणामारीदेखील होत असे. असाच घटनेच्या दिवशी घरगुती कारणावरून वाद सुरू झाला आणि काही मिनिटांतच तो विकोपाला गेला. वडील आणि मुलगा यांच्यात काही वेळ हाणामारी झाली. त्यावेळी संतापलेल्या मुलाने वडिलांना एक कानशिलात लगावली. त्यामुळे चक्कर येऊन ते कोसळले आणि त्यानंतर त्यांचा मृत्यू झाला.

वडिलांचा जागीच मृत्यू

मुलगा आणि वडील यांच्य़ामध्ये झालेलं घरगुती भांडण पाहण्यासाठी शेजाऱ्यांनी तसेच गावकऱ्यांनी मोठी गर्दी केली होती. पूंजा कटारा यांचा मृत्यू झाल्याची माहिती शेजाऱ्यांनीच तातडीने पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टेमसाठी पाठवून दिला आहे. वडिलांना कानाखाली मारून त्यांचा जीव घेणाऱ्या मुलाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस