शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: पत्नीला पिकनिकला नेले, हौसमौज पुरवली, मग हत्या केली, असे उघड झाले धक्कादायक हत्याकांड

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2022 18:00 IST

Crime News: हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पतीने त्याच्या पत्नीला फिरवण्याचा बहाणा करून दुचाकीवरून पिकनिक स्पॉटवर नेले. तिथे तिला फिरवले, सेल्फी घेतल्या, भरपूर खाऊपिऊ घातले. शॉपिंग केली. त्यानंतर संध्याकाळी तिची हत्या केली.

रायपूर - छत्तीसगडमधील दुर्ग जिल्ह्यामध्ये हत्येचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका पतीने त्याच्या पत्नीला फिरवण्याचा बहाणा करून दुचाकीवरून पिकनिक स्पॉटवर नेले. तिथे तिला फिरवले, सेल्फी घेतल्या, भरपूर खाऊपिऊ घातले. शॉपिंग केली. त्यानंतर संध्याकाळी तिची हत्या केली. मग हत्येचा गुन्हा लपवण्यासाठी या पतीने जबरदस्त कहाणी रचली आणि पोलिसांना चकवा देण्यासाठी तो पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार घेऊन ठाण्यात गेला. तिथे त्याने पोलिसांना एक खोटी कहाणी ऐकवली आणि तो घरी गेला. पोलिसांनी जेव्हा या प्रतरणाचा तपास सुरू केला तेव्हा धक्कादायक माहिती समोर आली.

हा धक्कादायक प्रकार दुर्ग आणि राजनांदगाव, या दोन जिल्ह्यांतील संबंधित आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार गुलशन देशमुख नावाचा तरुण १३ मे रोजी पत्नी नंदिनी देशमुख हिला घेऊन मनगटा डोंगरावर पिकनिकसाठी गेला. तिथे तिला फिरवले. खूप हौसमौज करवली. त्यानंतर शॉपिंग केले आणि अखेरीस तिची तलावात बुडवून हत्या केली.

त्यानंतर तो पोलीस ठाण्यात पोहोचला. तेथे त्याने पोलिसांना वेगळीच कहाणी ऐकवली. त्याने पोलिसांना सांगितले की, परतत असताना त्यांच्या दुचाकीमधील पेट्रोल संपत आलं होतं. रसमडाजवळ एका फ्युएल स्टेशनवर आम्ही पेट्रोल घेण्यासाठी गेलो. मात्र तिथे पेट्रोल नसल्याने मी पत्नीला तिथेच उभं करून दुसऱ्या पेट्रोल पंपावर गेलो. मात्र तिथून परत आलो तर पत्नी गायब होती.

पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला तेव्हा त्यांना गुलशनवर संशय आला. त्यांनी पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिले. मात्र त्यात तो दिसला नाही. अखेर पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली. तेव्हा काही धक्कादायक गौप्यस्फोट त्याने केले. त्याने सांगितले की, चार वर्षांपूर्वी त्याचा आणि नंदिनीचा विवाह झाला होता. मात्र माझं माझ्या पत्नीवर प्रेम नव्हतं. त्यामुळे मीच तिच्यापासून सुटका करून घेण्यासाठी तिची हत्या केली. असं त्याने पोलिसांना सांगितलं.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीFamilyपरिवार