शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताला ५० टक्क्याचा शॉक; ट्रम्प यांनी दुप्पट केले टॅरिफ; काय होणार परिणाम?
2
आजचे राशीभविष्य, ०७ ऑगस्ट २०२५: चिंतामुक्त व्हाल, हाती पैसा राहील; यशाचा शुभ दिवस
3
डोनाल्ड ट्रम्पच्या प्रयत्नांनाही पुतिन बधले नाहीत! चीनसोबत युद्धाची तयारी सुरू; पुढे काय करणार?
4
घरे, झाडे सर्व काही गाडले, हाती काही लागेना; मानवाच्या हव्यासाने आले संकट
5
डोनाल्ड ट्रम्प भारतात राहायला येणार? रहिवासी प्रमाणपत्रासाठी केला अर्ज! प्रशासनाची कोंडी
6
उत्तराखंडमधील ढगफुटीचे थैमान; महाराष्ट्रातील ५१ पर्यटक सुरक्षित
7
सावरकर सदन: वारसास्थळ दर्जाचा लवकरच निर्णय; महापालिकेची हायकोर्टात माहिती; अभिनव भारत काँग्रेसची याचिका
8
रेपो दर जैसे थे; कर्ज हप्ता राहणार स्थिर; ‘ट्रम्प टॅरिफ’च्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचा निर्णय
9
दिव्याखाली अंधार! हा घ्या, अमेरिकेने रशियाकडून केलेल्या आयातीचा हिशेब
10
महिंद्रा अँड महिंद्रा समूहाचे कर्मचारी होणार मालामाल, मिळणार ५०० कोटींचे शेअर्स
11
शिंदे, ठाकरे दिल्लीत, चर्चा महाराष्ट्रात! एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्याशी बंदद्वार चर्चा; पंतप्रधानांना सहकुटुंब भेटले
12
यूपीआय फ्री की फी? शुल्काचे संकेत; काय म्हणाले RBI गवर्नर संजय मल्होत्रा?
13
...तर निवृत्तीनंतरचे आयुष्य येईल धोक्यात, हे करा उपाय
14
"हा अमेरिकेचा दुटप्पीपणाच, भारताने आता..."; शशी थरुर यांनी मोदी सरकारला काय दिला सल्ला?
15
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
16
"अंधभक्तांना विनंती, राजकीय नियुक्तीचे समर्थन करु नका; कारण..."; रोहित पवारांनी काय दिला इशारा?
17
अहिल्यानगर: चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शिक्षकाकडूनच अत्याचाराचा प्रयत्न, नेत्याने प्रकरण दाबले; पण...
18
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
19
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
20
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले

Crime News: धक्कादायक प्रकरण: होणाऱ्या पतीने सोशल मीडियावर केली गंमत, जीव गमावून मोजावी लागली किंमत  

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2022 14:58 IST

Crime News: बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरूमधील एका डॉक्टराने केलेली एक गंमत त्याच्या जीवावर बेतली

बंगळुरू - बंगळुरूमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. बंगळुरूमधील एका डॉक्टराने केलेली एक गंमत त्याच्या जीवावर बेतली. या डॉक्टराने गमती गमतीमध्ये होणाऱ्या पत्नीचा एक न्यूड फोटो सोशल मीडियावर अपलोड केला. एवढंच नाही तर तो फोटो मित्रांसोबतही शेअर केला. त्यामुळे संतप्त झालेल्या या डॉक्टराच्या होणाऱ्या पत्नीने तीन मित्रांसोबत मिळून या डॉक्टराची हत्या केली.

मिळालेल्या माहितीनुसार मुळचा चेन्नईतील असलेला डॉक्टर विकास राजन येथील बीटीए लेआऊट परिसरामध्ये राहायचा. त्याच्यावर १० सप्टेंबर रोजी रात्री हल्ला करण्यात आला. त्याची होणारी पत्नी आणि तिच्या दोन सहकाऱ्यांनी मिळून हा हल्ला केला होता. आरोपी बीटीएम लेआऊट येथे राहणारे आहेत. पोलिसांनी त्यांना अटक केली आहे. त्यानंतर पोलीस एक अन्य आरोपी सूर्या याच्या तपासात गुंतले आहेत.

विकासच्या मोठ्या भावाने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी संशयितांविरोधात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करून तपास सुरू केला होता. त्यानंतर या हत्याकांडाचा उलगडा झाला. मृत विकास हा सदर महिलेसोबत दोन वर्षांपासून रिलेशनमध्ये होता. त्यांचा साखरपुडाही झाला होता.

दरम्यान, विकासने सोशल मीडियावर मित्राच्या नावाने अकाऊंट उघडून त्यावर होणाऱ्या पत्नीचे काही न्यूड फोटो अपलोड केले. त्याबरोबरच ते आपल्या काही मित्रांनाही पाठवले. या महिलेने इन्स्टाग्रामवर हे फोटो पाहिले तेव्हा तिला धक्का बसला. तिने विकासकडे विचारणा केली तेव्हा त्याने केवळ गंमत म्हणून आपण तसं केल्याचं सांगितलं. मात्र त्यावरून या दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर या महिलेने विकासला अद्दल घडवण्यासाठी मित्रांसोबत एक प्लॅन आखला. त्यांना विकासला जीवे मारायचे नव्हते. पण त्यांनी केलेल्या मारहाणीत विकास गंभीर जखमी झाला. ते त्याला रुग्णालयात घेऊन गेले. मात्र तिथे त्याचा मृत्यू झाला.  

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी