शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Crime News : धक्कादायक! ४५ लाख रुपयांच्या लुटीप्रकरणी पुण्यातील तीन पोलिसांविरोधात गुन्हा दाखल, एक आरोपी अटकेत, तर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2022 20:02 IST

Crime News: नाशिक मुंबई महामार्गा वरील हायवेदिवे येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपा समोर तिघा अज्ञात इसमांनी अडवून पोलीस असल्याचे सांगत त्याच्या ताब्यातील ४५ लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केल्या प्रकरणी नारपोली पोलिसांनी एक आरोपीस पुणे येथून अटक केली आहे.

- नितिन पंडीत  भिवंडी - नाशिक मार्गे मुंबई येथे हवाला मार्गे रोख ४५ लाख रुपयांची रक्कम घेऊन जाणाऱ्या कार चालकास मंगळवारी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान नाशिक मुंबई महामार्गा वरील हायवेदिवे येथील इंडियन ऑईल पेट्रोल पंपा समोर तिघा अज्ञात इसमांनी अडवून पोलीस असल्याचे सांगत त्याच्या ताब्यातील ४५ लाख रुपयांची रोकड घेऊन पोबारा केल्या प्रकरणी नारपोली पोलिसांनी एक आरोपीस पुणे येथून अटक केली आहे. तर या गुन्ह्यात समावेश असलेले पुणे दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत तीन आरोपी पोलीस कर्मचारी फरार झाले आहेत. पोलिसांनी पोलिसां विरोधात लुटमारी प्रकरणी गुन्हा दाखल केल्याने खळबळ माजली आहे.

 या बाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार औरंगाबाद येथील रामलाल मोतीलाल परमार हे ८ मार्च रोजी आपल्या ब्रिझा कार मधून नाशिक येथून व्यापाऱ्याची हवाला व्यवहारातील ४५ लाख रोकड घेऊन मुंबई येथे देण्यासाठी निघाले असता नारपोली पोलीस ठाणे हद्दीत हायवे दिवे येथील पेट्रोल पंपावर दबा धरून बसलेल्या तीन इसमांनी कार थांबवून कार मधील रोकड घेऊन पोबारा केला होता . याप्रकरणी १० मार्च रोजी रात्री उशिरा नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भिवंडी पोलीस उपायुक्त योगेश चव्हाण, सहाय्यक पोलीस आयुक्त प्रशांत ढोले व वरिष्ठ पोलीस निरीक्षक मदन बल्लाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन पाटील यांच्या नेतृत्वाखालील पोलीस पथकाने या गुन्ह्याचा तपास सुरू केला असता तांत्रिक माहितीच्या आधारे पुणे येथून बाबूभाई राजाराम सोळंकी यास ताब्यात घेतले असता या गुन्ह्याची उकल झाली. त्याकडे कसून चौकशी केली असता पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील दत्तवाडी पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस कर्मचारी गणेश शिंदे,गणेश कांबळे,दिलीप पिलाने यांचा सहभाग निश्चित झाला .या तिघा जणांनी कार चालकास थांबवून त्याकडील रक्कम लुबाडली असल्याचे तपासात निष्पन्न झाल्याने त्यांच्या विरोधात सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सध्या हे तिन्ही आरोपी पोलीस कर्मचारी फरार असल्याने पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.

सूत्राने दिलेल्या महिती नुसार आरोपी असलेले हे तिन्ही पोलीस कर्मचारी गुन्हा करताना आपल्या सेवेवर कार्यरत असल्याचे समोर येत असून रात्री ११ वाजता त्यांनी पुणे ते भिवंडी प्रवास करून सकाळी ४ वाजता ते गुन्हा घडलेल्या ठिकाणी दबा धरून बसले होते . व गुन्हा करून माघारी पुन्हा पुणे येथे कामावर हजर झाले होते .  या तिघांनी लुटी मधील प्रत्येकी नऊ नऊ लाख रुपये आपापसात वाटून घेतल्याची माहिती मिळत आहे .

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीbhiwandiभिवंडी