शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
4
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
5
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
6
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
7
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
8
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
9
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
10
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
11
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
12
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
13
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
14
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
15
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
16
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
17
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
18
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
19
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
20
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
Daily Top 2Weekly Top 5

Crime News: ठाण्यात स्पाच्या नावाखाली सेक्स रॅकेट, दोन महिलांसह तिघांना अटक, दोन पीडितांची सुटका

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 22:21 IST

Crime News: उच्चभ्रू वस्तीमध्ये स्पाच्या नावाखाली काही महिलांकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिलांसह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने गुरुवारी दुपारी अटक केली.

ठाणे : उच्चभ्रू वस्तीमध्ये स्पाच्या नावाखाली काही महिलांकडून सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोन महिलांसह तिघांना ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने गुरुवारी दुपारी अटक केली. त्यांच्या तावडीतून दोन पीडित महिलांची सुटका केल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी शुक्रवारी दिली. 

घोडबंदर रोडवरील आनंदनगर, कावेसर भागातील एका स्पा सेंटरमध्ये स्पा आणि मसाज पार्लरचे मालक, तसेच त्यांचे साथीदार हे असाह्य गरीब महिलांना पैशाच्या आमिषाने फूस लावून मसाज सेंटरच्या नावाखाली त्यांच्याकडून शरीर विक्रयाचा व्यवसाय करून घेतात, अशी माहिती अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभागाला मिळाली होती. त्याच माहितीच्या आधारे ली पोश युनिसेक्स स्पा सेंटरमध्ये २४ मार्च रोजी दुपारी ३.३० वाजण्याच्या सुमारास वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या पथकाने सापळा लावून बनावट ग्राहकाच्या मदतीने दोन महिला, तसेच एक पुरुष दलाल अशा तिघांना ताब्यात घेतले. त्यांच्या तावडीतून दोन पीडित महिलांची सुटका केली. या तिघांविरुद्ध कासारवडवली पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार (प्रतिबंध) कायद्याखाली गुन्हा दाखल केला आहे. त्यांनी आणखी कोणत्या महिलांची अशा प्रकारे फसवणूक केली आहे का, याचाही तपास करण्यात येत असल्याचे पोलिसांनी सांगितले. यापूर्वी दोन वेळा लावले सापळे...सध्या ठाणे गुन्हे शाखेच्या वतीने महिलांविरुध्दच्या गुन्हयाची मोहीम सुरु  आहे. ठाणे शहरातील उच्चभ्रू वस्तीमधील स्पा आणि मसाज पार्लरचे मालक असहाय्य महिलांचा गैरफायदा घेऊन त्यांच्या मार्फतीने सेक्स रॅकेट चालवित असल्याबाबतच्या तक्रारी ठाणो गुन्हे अन्वेषण विभागाच्या अनैतिक मानवी वाहतूक विभागाकडे गेल्या काही दिवसांपासून आल्या होत्या. त्याच तक्रारीच्या अनुषंगाने या पथकाने अशाच काही भागांमध्ये यापूर्वी दोन वेळा सापळे लावले होते. मात्र, पोलिसांची चाहूल लागताच असे रॅकेट चालविणारे पोलिसांनी हुलकावणी देत होते. मात्र, गुरुवारच्या या कारवाईमध्ये अखेर दोन महिलांसह तिघांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रंनी दिली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीthaneठाणे